रा.स्व.संघाचा कार्यक्रम होता दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर पण..

मंगळुरू स्फोटची योजना

    25-Nov-2022
Total Views |
Mangalore blasts
 
 
 
मंगळूरू  ( Mangalore blasts ): कर्नाटकातील मंगळुरू येथे १९ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या स्फोटाची जबाबदारी इस्लामिक रेजिस्टेंस काउंसिल (IRC) ने घेतली आहे. बॉम्बस्फोटानंतर अटक करण्यात आलेल्या मोहम्मद शरीकला आपला 'मुजाहिद' असल्याचे सांगितले. शारिकला मंदिराला टार्गेट करयचे होते, पण वाटेत स्फोट झाला. एका अहवालानुसार, त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमात स्फोट घडवण्याची योजना आखली होती ज्यामध्ये सुमारे १०,००० मुले सहभागी झाली होती. मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली.
 
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या IRC पोस्टमध्ये म्हटले आहे की आमचा मुजाहिद भाऊ मोहम्मद शरीक याने मंगळुरूमधील काद्री (दक्षिण कन्नड जिल्ह्यातील) येथील हिंदू मंदिरावर ( Mangalore blasts ) हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेचा उद्देश पूर्ण झाला नाही. पण आम्ही ते धोरणात्मक यश मानतो. यासोबतच भविष्यातही हल्ले सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा बॉम्बही शारिकनेच बनवला होता, असेही सांगण्यात आले आहे.
 

Mangalore blasts 
 
 
एका हिंदी दैनिकाने आपल्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शारिकला १९ नोव्हेंबर रोजी आरएसएसशी संलग्न असलेल्या केशव स्मृती संवर्धन समितीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बाल उत्सव कार्यक्रमात स्फोट ( Mangalore blasts ) घडवायचा होता. विद्यार्थी असल्याचे भासवून त्यांनी कार्यक्रमात प्रवेश करण्याचे नियोजन केले होते. त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणाचा शोधही घेतला होता. पण नंतर त्याला योजना बदलावी लागली.
 
मिळालेल्या माहितीनुसार शरीककडे चौकशी केली असता तो हिंदू म्हणून राहत होता. बेल्लारी येथील एका हिंदूच्या आयडीवर जारी केलेले सिम कामासाठी वापरले. हे आधार कार्ड सुरेंद्रन नावाच्या व्यक्तीचे असून ते शिक्षक आहेत. सुरेंद्रन आणि शरीक कोइम्बतूरमधील एका हॉटेलमध्ये भेटल्याचे सांगण्यात येत आहे. तेथे शरीकने सुरेंद्रनला बेरोजगार असल्याचे सांगत मदत मागितली होती. दरम्यान, शारिकने सुरेंद्रन यांना काही लोकांशी बोलण्यासाठी सिम खरेदी करण्याची विनंती केली होती.
सध्या पोलीस ( Mangalore blasts ) हॉटेल कर्मचारी, सुरेंद्रन आणि सिम विकणाऱ्या दुकानदाराची स्वतंत्रपणे चौकशी करत आहेत. शारिक आजूबाजूच्या हिंदूंसोबत त्यांचे सण साजरे करायचे. ३ लाखांचे बक्षीस असलेले दुबईत राहणाऱ्या अब्दुल मतीन ताहाच्या सूचनेवरून तो कारवाई करत होता, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.