मुंबई : टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन (वय २८) हिचा मृत्यू अपघाती झाल्याचा निष्कर्ष सीबीआयच्या तपास अहवालाअंती काढण्यात आला आहे. तिचा मृत्यू ८ जून २०२० रोजी झाला होता. त्याच मध्यरात्री मालाडच्या गॅलेक्सी रिजेंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाला होता. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे. त्यानंतर पाचच दिवसांनी सुशांत सिंह राजपूतचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.
दारूच्या नशेत तोल जाऊन पडल्याने दिशाचा मृत्यू झाल्याची माहिती सीबीआयने तपासात दिली आहे. दिशा सालीयन मृत्यू प्रकरणाचा स्वतंत्र तपास नसला तरीही सुशांत सिंह राजूतच्या मृत्यू प्रकरणातील तपासात या दिशाच्या मृत्यूचीही चौकशी करण्यात आली होती. दिशा आणि सुशांत हे काही काळ काम केले होते, त्यामुळे दिशा आणि सुशांत सिंह राजपूत दोन्ही मृत्यूंचा संबंध असल्याचा आरोपही झाला होता. तिच्याही मृत्यूची चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरण सध्या सीबीआयकडे आहे. त्याच तपासादरम्यान दिशाच्या मृत्यूचाही तपास केला जात असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रकरण नेमकं काय?
८ जून रोजी दिशाच्या वाढदिवसानिमित्त घरी पार्टीचे आयोजन केले होते. त्याच दिवशी रात्री पार्टीत दारू प्यायलेल्या दिशाचा तोल गेला आणि फ्लॅटच्या पॅरापेटवरून घसरली.', असा सीबीआयचा तपास सांगतो. या पार्टीवेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि घटना स्थळाच्या पहाणी अहवाल याचे चौफेर धारेदोरे तपासल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.