सोमय्यांचा कायदेशीर मार्गानं 'हातोडा'; अनिल परबांविरोधात तीन गुन्हे दाखल!

    23-Nov-2022
Total Views |


सोमय्यांचा कायदेशीर मार्गानं 'हातोडा'; अनिल परबांविरोधात तीन गुन्हे दाखल!
रत्नागिरी : 'तो मी नव्हेच, असे म्हणणाऱ्या माजी मंत्री आणि उबाठा गट नेते अनिल परबांविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्यांनी दिली आहे. ते म्हणाले, "पहिली एफआयआर दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यांनी ग्रामपंचायतकडे खोटी कागदपत्रे दाखवून १५ हजार ८०० चौरस फुटांचा रिसॉर्ट स्वतःच्या नावे करुन घेतला. दुसरी एफआयआर म्हणजे सदानंद कदम यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांतील एफआयआरमध्ये आता अनिल परबांचे नाव पुन्हा नोंदविण्यात आलेले आहे. सदानंद कदम आणि अनिल परबांनी कोविड काळात रिसॉर्ट बांधले. तसेच तिसरी तक्रार ही भारत सरकारतर्फे दाखल करण्यात आली असून त्याची दखल घेतली आहे.", असेही ते म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी कायदेशीर मार्गाने जात अखेर अनिल परब यांच्या कथित मालकीच्या रिसॉर्ट पाडकामाला सुरुवात केली आहे. रिसॉर्ट उभारण्यासाठी २५ कोटी आले कुठून? हा पैसा वाझेचा की खरमाटेचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. साई रीसॉर्ट व सी कॉच रिसॉर्ट येत्या तीन महिन्यांत दोन्ही रिसॉर्ट ही जमीदोस्त होतील, असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. परबांवर एक गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
सोमय्या म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेल्या ट्विन रिसॉर्ट असलेल्या 'सी कॉच'वर पडण्याची कारवाई सुरू आहे. मी पण मोठा हातोडा घेऊन आलो आहे. महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेच्या वतीने मी पहिला हातोडा मारला आहे. ही जमीनपण अनिल परब यांनी कब्जा केली होती. हे सगळे पाडण्यासाठी यश कन्स्ट्रक्शनला दोन्ही काम टेंडर भरल्यावर मिळाली आहेत. त्यामुळे येत्या ४० ते ५० दिवसात दोन्ही रीसॉर्ट जमीनदोस्त होतील.", असेही ते म्हणाले.
अनिल परबांना मोठा दणका!
साई रिसॉर्ट शेजारी असलेल्या सी काँच रिसॉर्टच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. रिसॉर्टमालक पुष्कर मुळ्येला फरार घोषित करा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. यापूर्वी सोमय्या यांनी दिली होती. तसाच गुन्हा अनिल परब यांच्यावरही दाखल करण्यात येईल. या गुन्ह्यात तीन वर्षांचा कारवास होऊ शकतो. हे रिसॉर्ट बांधकामसाठी पैसे कुठून आले याची चौकशी इन्कम टॅक्स व ईडी करून करण्यात येत आहे हे रिसॉर्ट पडले की त्याचीही चौकशी होईल, असेही सोमय्या म्हणाले.
 
रिसॉर्टचे बांधकाम कोविड काळात!
सोमय्या म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांचा उजवा हात असलेले अनिल परब कोरोड कालावधीत काळी काम करत होते. इलेक्ट्रिक बिल अनिल परब यांच्या नावाने येत आहे. या जागेचे मूळ मालक विभास साठे यांनी लिहून दिले आहे की मी जमिन विकली पुढील एनए करून फसवणूक ही अनिल परब यांनी केली आहे. रिसॉर्ट सीआरझेडमध्ये बांधण्याचा हा गुन्हा आहे. १४ नोव्हेंबर रोजी ही दोन्ही रिसॉर्ट पाडण्यासाठी एजन्सीकडुन मागवण्यात आलेल्या निविदा उघडण्यात आल्या. यावेळी हे काम मुंबईतील एका एजन्सीला देण्यात आले आहे. त्यानंतर सी कॉंच रिसॉर्ट वरील प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे."