सुबोध भावेंच्या नव्या चित्रपटाची घोषणा ; अरुण गोविल यांच्यासोबत करणार काम
22-Nov-2022
Total Views |
मुंबई : अभिनेता सुबोध भावे सध्या ऐतिहासिक आणि संस्कृती सांगणाऱ्या चित्रपटांत काम करताना व्यग्र आहे. नुकताच त्यांनी एका चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा त्याचा एक चित्रपट येऊ घातला आहे. जेष्ठ अभिनेते अरुण गोविल यांच्यासोबत फोटो टाकून त्याने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या पोस्ट वरून अरुण यांच्यासोबतचा फोटो शेअर करत सुबोध म्हणतो, "विक्रम - वेताळ आणि रामायण लहानपणी पाहिलेल्या आणि कायमस्वरुपी लक्षात राहिलेल्या या दोन मालिका. त्यातील प्रमुख भूमिका साकारणारे " अरुण गोविल" सर. त्यांचा चाहता होतोच. त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली." आपल्या पोस्ट मधून अरुण याना शुभेच्छा देताना तो म्हणतो तुम्ही साकारलेल्या राममूर्तीला माझा मनापासून नमस्कार.
आजपर्यंत अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक मालिका छोट्या पडद्यावर येऊन गेल्या. पण त्यातील एका मालिकेने आणि पात्रांनी मात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम घर केलं. ही मालिका म्हणजे रामानंद सागर यांचं 'रामायण'. या रामायणात जेष्ठ अभिनेते अरुण गोविल यांनी साकारलेली रामाची भूमिका अजरामर ठरली आहे. आजही प्रेक्षक या अभिनेत्यांना देवाच्याच रूपात पाहतात. आता अभिनेता सुबोध भावे याने छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रॅम साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांची भेट घेतली आहे.