मुंबई : 'भारत जोडो' यात्रेत काँग्रेसचे नेते नितीन राऊत सहभागी होण्यासाठी हैदराबादला गेले असता जखमी झाले आहेत. भारत जोडो यात्रेत पोलीसांच्या धक्काबुक्की दरम्यान ते खाली कोसळले. त्यात उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच हाताला आणि पायालाही दुखापत झाली. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी तेलंगणातील हैदराबादच्या वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.