मुंबई : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना एसआरएने दणका दिला आहे. किशोरी पेडणेकरांच्या वरळीतील चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएकडून मुंबई महापालिकेला देण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एसआरएने मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यामुळे किशोरी पेडणेकरांसाठी हा पहिला मोठा दणका आहे.
किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या कंपनीमार्फत म्हणजेच कीश कॉर्पोरेशनच्या माध्यमातून वरळी गोमाता जनता एसआरए प्रकल्पातील ४ सदनिका बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. एसआरएने किरीट सोमय्यांनी केलेली तक्रार स्वीकारत हे चार गाळे ताब्यात घेण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले. तसेच पुढील ४ दिवसांत मुंबई मनपा अधिकारी हे गाळे रिकामे करून एसआरएच्या ताब्यात देतील असे सोमय्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर एसआरए अधिकार्यांनी किशोरी पेडणेकर, किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस आणि बेनामी सहकारी विरुद्ध कलम ३ए अंतर्गत या सदनिकांचे निष्कासन करण्याचे आदेश दिले आहेत.