‘ट्रूसाईट सोल्युशन्स’

मैदानी खेळाडूंचे लोकल ‘सर्च इंजिन’

    17-Nov-2022   
Total Views | 83
sports


आपल्याकडे मैदानी खेळांची आस्था जरी कमी झालेली नसली तरी असे खेळ खेळण्यासाठी आपल्याकडे जागांची तसेच खेळण्यासाठी सहकार्‍यांची कमतरता भासते. कायमच आपल्याकडे असे कोणी सहकारीच नाहीत, तर कसे खेळणार, असे बरेच प्रश्न लोकांकडून विचारले जातात. पण, असे एखादे अ‍ॅप आले की, जे अशा लोकांना एकत्र आणते की, जे खेळण्यासाठी एकत्र येऊ इच्छितात आणि अगदी खरोखरच्या खेळांसारखे खेळण्याची संधी उपलब्ध करून देतात, असे अ‍ॅप जर समोर आले तर किती चांगले होईल, हीच किमया केली आहे, हर्षद लाखा यांनी आपल्या ‘ट्रूसाईट सोल्युशन्स’च्या माध्यमातून तयार केलेल्या ’स्पोर्ट्स लिंक’ या अ‍ॅपमधून. याच संदर्भातील ही मुलाखत...


आपल्या सर्वांना ‘टिंडर’, ‘इन्स्टाग्राम’, ‘फेसबुक’ यांसारखी अ‍ॅप्स माहीत आहेत. या अ‍ॅप्समधून आपण एकमेकांशी संपर्क साधत असतो. आपल्या चर्चा करत असतो. ही सगळी अ‍ॅप्स आपल्याला माहीत आहेत, त्यांच्या वापराबद्दल आपण खूप सजग असतो आणि तितक्याच गंभीरतेने वापरही करतो. त्याच पार्श्वभूमीवर असेच हे ‘स्पोर्ट्स अ‍ॅप’ आहे. असेच खेळांसाठी लोकांना एकत्र आणते. हेच काम या अ‍ॅपच्या माध्यमातून चालते.

आपल्याकडे मैदानी खेळ आणि त्यांच्याबद्दलची आस्था खूप आहे. हे मैदानी खेळ टिकले पाहिजेत, लोकांनी खेळले पाहिजेत, अशा चर्चाही सुरु असतात. पण या खेळांसाठी आता मैदाने शिल्लक नाहीत, खेळायला फारसा वेळ कोणाला नाही, खेळायला लोक एकत्र कुठून येणार, असे बरेच प्रश्न सध्या उपस्थित होतात. या सगळ्या प्रश्नांना अजूनच गंभीर बनवले ते कोरोनाच्या साथीने. या काळात सगळीकडे सगळेच बंद. लोक एकमेकांच्या संपर्कात येण्याससुद्धा घाबरत होते, अशा वेळेस खेळ वगैरे गोष्टींकडे कोण आणि किती लक्ष देणार? हा प्रश्न अजूनच गंभीर झाला. हे चित्र कधी पूर्वपदावर येईल, याची काहीच कल्पना नाही. त्यामुळे हे खेळ संपतात की काय किंवा विसरले जातात की काय, असे प्रश्न पडायला लागले. हे प्रश्न इतरांसारखे हर्षद आणि त्यांच्या मित्रांनाही पडले होते. या स्थितीवर काहीतरी उपाय शोधला पाहिजे, असे वाटून त्यांनी हे असे एखादे अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला. हर्षद यांच्या मित्रांनी आधीच हे अ‍ॅप सुरु केले होते. 2020 मध्ये हर्षद त्यांना ‘जॉईन’ झाले. याच काळात हा प्रवास सुरु झाला.

आता प्रश्न येतो तो म्हणजे, मी हे अ‍ॅप वापरणार कसे? आता हे लक्षात घेतले पाहिजे की, हे अ‍ॅप संपूर्णपणे मैदानी खेळांशीच संबंधित आहे. या अ‍ॅपवर सर्व मैदानी खेळ आहेत उदा. खो-खो, कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट यांसारखे खेळ या अ‍ॅपवर आहेत आणि ते खेळण्यासाठी या आपल्याला या अ‍ॅपवर स्वतःचे नाव पहिले रजिस्टर करावे लागते, यामध्ये इतर अ‍ॅपसारखीच अकाऊंट ओपन करण्याची पद्धत आहे. यात आपल्याला कुठले खेळ आवडतात, ते सांगायचे असतात. आपले ‘अकाऊंट’ तयार झाले की, आपल्याला आपल्या आवडीच्या खेळांची ’लिस्ट’ तयार होते. या ‘लिस्ट’मध्ये आपल्याला आवडणारे खेळ असातात. त्यानंतर आपल्याला लोकांची यादी दिसायला लागते की, जे हेच खेळ खेळण्यासाठी जे लोक तयार आहेत. मग, आपण त्यांच्याशी बोलून आपण ते कसे खेळायचे, ते त्यांच्याशी बोलून ठरवायचे. यात सर्वच खेळ हे स्पर्धात्मक असल्याने त्याच्यात आपल्याला आपण जे खेळतो, त्याच्यात गुण मिळवता येतात आणि या गुणांवरूनच हार-जित ठरवली जाते. असा हा ‘पॅटर्न’ आहे.
या संपूर्ण अ‍ॅपमध्ये ज्या खेळांमध्ये स्पर्धा करता येते, असेच खेळ समाविष्ट केले आहेत.

 जेणेकरून त्यांच्यात दोन स्पर्धांकांत स्पर्धा होईल आणि पॉईंट्स मिळवता येतील. त्यामुळे आपण हे खेळ खेळू शकतो, ज्यातून आपल्याला आपले हे मैदानी खेळ खेळण्यासाठी स्पर्धक मिळवता येतील. यातून सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला कळेल की, एका खेळात आपल्या शहरात कोण चांगला खेळाडू आहे, समजा खो- खो सारखा खेळ आहे, त्यात आपण जर पुणे शहरात राहत असू, तर आपल्या पुणे जिल्ह्यात नेमके किती लोक चांगल्या पद्धतीने खो-खो खेळतात, कुठली टीम चांगली आहे, मग त्या टीमला आपण जर चॅलेंज केले, तर आपल्याला अजून चांगले खेळता येईल, हे अ‍ॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. हे फक्त सांघिक खेळांपुरतेच मर्यादित नाही, तर वैयक्तिक खेळांनासुद्धा असेच निकष लागू होतात. अगदी आपल्या शहरात चांगला ‘बॅडमिंटनपटू’ कोण आहे, हे देखील आपल्याला कळते. यातून अजून एक चांगली गोष्ट घडू शकते ती म्हणजे, जे ’टॅलेंट’ लपले आहे, ज्यांना पुढे येण्याची कुठलीही संधी मिळत नाही, खेळाच्या माध्यमातून आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळत नाही, अशा या लपलेल्या ‘टॅलेंट’साठी हा एक मोठा ’प्लॅटफॉर्म’ ठरू शकतो, असे हर्षद यांना वाटते.

आता या क्षेत्राच्या भविष्याबाबद्दल बोलायचे झाल्यास, या अशा प्रकारच्या ‘प्लॅटफॉर्म्स’ची गरज भविष्यात खूप भासणार आहे. या अशा माध्यमांमधून अनेक खेळाडू ज्यांना अशा काही संधी मिळत नाहीत ते पुढे येतील. याहीपुढे जाऊन जगभरातील सर्वच छोटे-मोठे खेळाडू या अ‍ॅपवर आणण्याचे ध्येय आहे. यातून सर्व खेळाडूंना त्यांच्या खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी, आपल्यासारखे खेळाडू घडवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्या खेळाडूंमध्ये चर्चा करण्यासाठी एक ‘प्लॅटफॉर्म’ मिळेल, जेणेकरून त्यांना त्यांच्या खेळांच्या विकासासाठी काम करता येईल. यात आपल्या खेळांबरोबर त्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठीही प्रोत्साहन मिळेल. मुख्यतः ग्रामीण दुर्गम भागांतील खेळाडूंना या अ‍ॅपच्या माध्यमातून जगभरातील मोठ्या खेळाडूंशी संपर्क करता येईल, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवता येईल. सध्या जवळचे जे लक्ष्य आहे, त्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय बाजारात आपला जम बसवणे हेच मुख्य लक्ष्य आहे. लोकांना यातून स्फूर्ती मिळाली पाहिजे की, जर आपल्या बरोबरीचा या अ‍ॅपवर खेळून पुढे येऊ शकतो, ‘पॉईंट्स’ मिळवू शकतो तर आपणही ते केले पाहिजे, असा विश्वास आणि इच्छा त्यांच्या मनात निर्माण होईल आणि तेही अशा खेळांकडे वळतील.

या क्षेत्रातच नव्हे, तर कुठल्याही क्षेत्रात आपल्याला उद्योग उभा करायचा असेल, तर आपण एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, आपण आपल्या इच्छेवर, स्वबळावर जर एखादे धाडस करण्यासाठी पुढे येत असू, तर मुळात हा असा विचार करणेच अभिनंदनीय आहे. यातून आपल्याला जर आपल्या विचारांवर विश्वास असेल तर नक्कीच न घाबरता, न डगमगता आपण पुढे जावे, बिनधास्त काम करावे, आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. पुढे आपल्याला उद्योग उभा करत असताना, ज्या काही अडचणी येतील त्यांना अजिबात घाबरू नये. बिनधास्त काम करावे, आपण जर प्रामाणिक असू आणि आपल्या विचारांची ताकद आपल्याला माहीत असेल, तर आपल्याला यश मिळवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, हाच विचार आपण मनात ठेवून काम करावे.
 


 

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा
आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न

आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शौर्य, प्रताप आणि सृजन अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळतात. सातारा जिल्ह्यासह कोकण, पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसापासून परदेशी पर्यटकापर्यंत येथील सौंदर्य स्थळे पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्या दृष्टीने महापर्यटन महोत्सव महत्त्वाचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये ₹100 कोटींची गुंतवणूक आली तर किमान 10,000 रोजगार संधी निर्माण होतात. म्हणूनच पर्यटन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121