‘नो मनी फॉर टेरर’ जागतिक परिषदेत उद्यापासून प्रारंभ

- डार्क वेब, क्रिप्टो करन्सीसह समाज माध्यम गैरवापराचा मुद्दा भारत मांडणार

    16-Nov-2022
Total Views |
 
नो मनी फॉर टेरर
 
 
 
नवी दिल्ली : समाज माध्यमे, डार्क वेब, क्रिप्टो करन्सीचा दहशतवादी गटांकडून होणारा गैरवापर आणि त्याविषयी जागतिक एकमत नसणे, हे मुद्दे भारत नो मनी फॉर टेरर या जागतिक परिषदेमध्ये मांडणार आहे. नवी दिल्ली येथे १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी ही परिषद होणार आहे.
 
 
दहशतवादास होणारा अर्थपुरवठा रोखण्याविषयीच्या या जागतिक परिषदेमध्ये ७५ देश आणि विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये भारत प्रामुख्याने दहशतवादी संघटनांद्वारे अर्थपुरवठ्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा होणारा वापर हा मुद्दा मांडणार आहे.
 
 
वित्त पुरवठ्यासाठी दहशतवादी संघटना आता क्राउडफंडिंगता मार्ग मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे पुढे आहे. या मार्गाद्वारे वित्त पुरवठ्या करणाऱ्यांचा शोध घेणे अतिशय कठिण होत असल्याने दहशतवादी संघटनांच्या पथ्यावर पडले आहे. त्याचप्रमाणे एनजीओ आणि सामाजिक संघटनांचा वापर वित्त पुरवठ्यासाठी केला जातो. इंटरनेट विश्वातील डार्क वेब, व्यावसायिक हॅकर्सचाही वापर त्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे सध्या क्रिप्टो करन्सीचादेखील वापर दहशतवादी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
 
 
अशा सर्व प्रकारच्या मनी लॉन्ड्रिंगला आळा घालण्यासाठी विविध देशांच्या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींमधील समन्वय कसा वाढवता येईल आणि क्रिप्टो करन्सी आणि क्राउडफंडिंग यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाला कसे रोखता येईल, यासाठी भारत परिषदेमध्ये पुढाकार घेणार आहे.
 
 
आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी भारत आग्रही
 
आंतरराष्‍ट्रीय, राष्‍ट्रीय आणि प्रादेशिक स्‍तरावर विविध देशांमध्‍ये परस्पर सहकार्य असण्‍याची सध्याची गरज आहे. दहशतवादी कारवाया आणि मनी लॉन्ड्रिंगच्या बदलत्या पद्धतींबाबत सर्व देशांचे कायदे, अंमलबजावणी यंत्रणा यांमध्ये समन्वय आवश्यक आहे. खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये माहितीची देवाणघेवाण चांगल्या प्रकारे व्हावी यासाठीदेखील व्यवस्था तयार करण्यासोबतच विविध देशांच्या फायनान्शियल इंटेलिजन्स यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी भारत आग्रही आहे.