पुणे : “ ‘ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन’ ही संस्था लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, बॅक स्टेज कलावंत, नाटक, एकपात्री आणि चित्रपट अशा विविध कला घटकांसाठी कार्यरत आहे. संस्थेच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त विविध कला क्षेत्रातील मान्यवरांचा ’कलाभूषण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे,” अशी माहिती ‘ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन’चे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी दिली.
अधिक माहिती देताना योगेश सुपेकर म्हणाले, “ज्येष्ठ कलावंताना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून आणि युवा कलावंताना प्रेरणा देण्यासाठी आम्ही ‘कलाभूषण’ पुरस्काराने गौरविणार आहोत. यामध्ये ‘ऑर्केस्ट्रा’ क्षेत्रात गेली 40 वर्षे काम करणारे महंमद रफी शेख यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मालिका क्षेत्रातील पदार्पणाबद्दल अभिनेत्री गिरिजा प्रभू, मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेता जगन्नाथ निवंगुणे, चित्रपट क्षेत्रासाठी शिवराज वाळवेकर, संगीत क्षेत्रातील युवा पुरस्कार अविनाश उर्फ बबलू खेडकर, संजय फलफले.
तसेच गौतम कांबळे यांच्या स्मरणार्थ साऊंड क्षेत्रातील पुरस्कार सचिन शिंदे, अझरुद्दीन अंसारी, नृत्यक्षेत्र कामिनी गायकवाड, संगीत लोकनाट्य क्षेत्र सविता अंधारे, प्रनोती कदम, तसेच तमाशा क्षेत्रातील योगदानाबद्दल रमेश पाटेवाडीकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे.निवेदन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मिलिंद कुलकर्णी, अविनाश घुले आणि निरजा आपटे यांना गौरविण्यात येईल.