मुंबई : मुंबईच्या उद्यानात आता उद्यान वाचनालय सुरु होणार आहेत. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये वाचनालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे. शनिवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी महापालिकेचे उद्यान निरीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या हस्ते मुलुंड पूर्वेतील डॉ चिंतामणराव देशमुख उद्यान येथे मोफत वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबई महापालिकेच्या या उपक्रम अंतर्गत बृहन्मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग आणि प्रोजेक्ट मुंबई, गॅबुला फ़ाउंडेशन, इनर व्हील क्लब, मेघाश्रय, एकता मंच यांच्यासह इतर काही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या विविध भागांमधील २२ उद्यानांमध्ये मोफत वाचनालये सुरु करण्यात आली आहेत, अशी माहिती पालिकेचे उद्यान निरीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.