आरेतील 'तो' बिबट्या ताब्यात?

आरेतील युनिट १५मधून दोन संशयित बिबटे ताब्यात; पुढील तपास सुरू

    30-Oct-2022
Total Views |
 Leopard
 
मुंबई(प्रतिनिधी): आरे दुग्ध वसाहतीतून दोन संशयित बिबट्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (बिबट्या) सोमवार दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका दीड वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू झाला होता. या नंतर आरे कॉलनीतील युनिट १५ मध्ये ट्रॅप कॅमेरा आणि पिंजरे लावण्यात आले होते. आरे दूध वसाहतीमध्ये आणि आरेमधील युनिट क्रमांक 15 च्या परिसरात मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनांसाठी दोन संशयित नर बिबट्या जबाबदार असू शकत असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले होते. युनिट १५ मध्ये वावर असलेले दोन संशयित बिबटे या पिंजऱ्यांमध्ये अडकले. बुधवार दि. २६ ऑगस्ट रोजी एका बिबट्याला पकडण्यात आले तर. रविवार दि. ३० ऑक्टोबर रोजी पहाटे आणखी एका बिबट्याला पकडण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या बचाव पथकाला यश आले.
 
या दोन्ही बिबट्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यातील बिबट्या बचाव केंद्रात नेण्यात आले आहे. त्यांची तपासणी करून अहवाल सादर करण्यात येईल त्यानंतर पुढील कारवाई बाबत निर्णय केला जाईल असे उद्यान प्रशासनाने सांगितले आहे. सोमवारी दि. २४ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पहिला दिवस असल्याने घराच्या आवारात दिवे लावून ही मुलगी घरी परतत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. परंतु, हे आपले सावज नाही असे लक्षात आल्यावर बिबट्याने तिला सोडून दिले. त्यानंतर या मिलीला सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गुरुवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते वन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत स्थानिक आमदार शोकाकुल कुटुंबाची भेट घेऊन त्यांना शासन मदत देऊ केली.