"मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला..."

गजानन काळेंचा किशोरी पेडणेकरांवर हल्लाबोल

    29-Oct-2022
Total Views |

Gajanan Kale - Kishori Pednekar
मुंबई : "मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या एसआरए योजनेत स्वतःला घर व ६ गाळे...", असं म्हणत मनसे नेते गजानन काळे यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकरांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये सहा गाळे/सदनिका हस्तगत केल्याचे पुराव्यानिशी सांगितले. त्यावर प्रतिक्रिया देत गजानन काळे यांनी 'सदर प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे', असा इशाराही दिली आहे.
 
 
"मोरूच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचं. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वतःला घर व ६ गाळे. मांजर लपून दूध पीत होती तर.या तर मुंबई पोखरणारी घुस निघाली असं म्हणायचं का आता? चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणातील कॉमेडी क्वीन 'भारती सिंग'", असे गजानन काळे यांनी म्हटले आहे.
 
किशोरी पेडणेकरांनी वरळीच्या गोमाता जनता एसआरएतील गाळे हडपले!
 
मुंबईच्या माजी महापौर श्रीमती किशोरीताई पेडणेकर व त्यांच्या किश कॉर्पोरेट प्रायवेट लिमिटेड कंपनीने वरळी येथील गोमाता जनता एस.आर.ए मध्ये काही गाळे हडप केले, काही गाळे बेनामी हस्तगत केल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारे पात्र भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण वांद्रे यांना लिहिले आहे. याबाबतची माहिती किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद गेट दिली.
 
किरीट सोमय्या माहिती देताना म्हणले, यापूर्वी मुंबईच्या माजी महापौर श्रीमती किशोरीताई पेडणेकर व त्यांच्या किश कॉर्पोरेट प्रायवेट लिमिटेड कंपनीने वरळी येथील गोमाता जनता एस. आर.ए मध्ये काही गाळे हडप केले, काही गाळे बेनामी हस्तगत केले यासंबंधीची मी तक्रार केली होती. श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांनी २०१७महापालिका निवडणूक नामांकन पत्रात त्यांचे रहिवाशी ठिकाण म्हणून वरळी गोमाता जनता एस. आर.ए च्या सहाव्या मजल्याच्या सदनिकेचा पत्ता दिला होता.
 
पुढे सोमय्या यांनी पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, श्रीमती किशोरीताई पेडणेकर किश कॉर्पोरेट प्रायवेट लिमिटेडचे मालक आणि प्रमोटर त्यांनी या कंपनीची रचना करताना या कंपनीचा रजिस्टर ऑफ कार्यालय म्हणून पत्ता रजिस्टर ऑफ कंपनीस भारत सरकारकडे गोमाता जनता एस. आर. ए प्रकल्पातील तळमजल्यातील दोन गाळे दर्शवले होते. एस.आर.ए ची गोमाता जनता एस. आर.ए मध्ये जे लाभार्थी होते म्हणजे त्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांच्या यादीत पेडणेकर परिवाराचे नाव नाही. लाभार्ती नसताना श्रीमती किशोरीताई पेडणेकरने अश्या प्रकारे वरळी गोमाता जनता एस. आर. ए चे अनेक गाळे आपल्या ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मी आपल्याला आग्रह केला होता आपण ताबडतोब श्रीमती किशोरीताई पेडणेकर व किश कॉर्पोरेट प्रायवेट लिमिटेडला नोटिस द्यावी व या गाळाचा कब्जा घ्यावा, अशी विनंती सोमय्या यांनी या पत्राद्वारे केली आहे.