दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती; फडणवीसांच्या दातृत्वाचा वरळीकरांना प्रत्यय

अग्निकांडातील उद्ध्वस्त कुटुंबाला उपमुख्यमंत्र्यांनी दिले नवजीवन

    25-Oct-2022   
Total Views |

worli
 
 
मुंबई : वरळीच्या डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावरील एका कुटुंबाचा सुखी परिवार अग्नितांडवात उद्ध्वस्त झाला होता. गुरुवार, दि. 20 ऑक्टोबरला झालेल्या त्या दुर्दैवी घटनेत गायकवाड परिवाराचा संपूर्ण संसार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला होता. तोंडावर दिवाळी आलेली असताना आगीत सगळा संसार नष्ट झालेल्या या कुटुंबाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची याचना केली. तत्काळ फडणवीसांनी यंत्रणा कार्यान्वित केल्या आणि अवघ्या चार दिवसांमध्ये त्या कुटुंबाचा संसार पुन्हा पूर्ववत करून आपल्या दातृत्वाची प्रचिती वरळीकरांना दिली आहे.
 
 
 
प्रकरण नेमके काय?
 
वरळीच्या डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावरील पंचशील-3 इमारतीत राहणार्‍या गायकवाड कुटुंबाचे घर गुरुवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी लागलेल्या आगीत जळून खाक झाले होते. आयुष्यभर कष्ट करून फुलवलेला संसार आणि त्या कष्टातून वसवलेले घर, अवघ्या काही क्षणांमध्ये नाहीसे झाले. काही दिवसांवर आलेली दिवाळी आणि डोक्यावरून हरवलेले छप्पर यामुळे दुःखाचाडोंगर कोसळलेल्या कुटुंबाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची याचना केली. त्यावर तत्काळ प्रतिसाद देत फडणवीस यांनी मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी समन्वय साधून त्या कुटुंबाला मदत पोहोच करण्याची तजवीज केली. फडणवीसांनी दिलेल्या आदेशानंतर लोढांनी सूत्रे हलवली आणि दक्षिण मुंबई भाजपच्या माध्यमातून त्या कुटुंबाला थेट मदत पोहोच करण्याचे कार्य करून दाखवले आहे.
 
 
फडणवीसांचे मनापासून आभार!
 
गुरुवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी पंचशील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील आमच्या घराला ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागली होती. घर बंद असल्यामुळे आगीचा लवकर अंदाज आला नाही आणि उशीर झाल्यामुळे आग विस्तारली. काही वेळाने स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांनी याबाबत पाहणी करून आम्हाला आधार देण्याचे काम केले. तसेच, केवळ चार दिवसांत आम्हाला प्रत्यक्ष मदत करण्याचे काम फडणवीसांनी करून दाखवले. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार!
- सनी आनंद गायकवाड, पीडित कुटुंबीय
 
 
नेतृत्व भक्कम असल्याचे उत्तम उदाहरण
 
सर्वसमावेशक आणि संवेदनशील नेतृत्व म्हणजे काय, याचे उत्तर आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. गायकवाड कुटुंबाने मदतीची याचना केल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये फडणवीस यांच्या माध्यमातून या कुटुंबाला मदत पोच करण्यात आली आहे. मुंबई भाजप केवळ राजकारण न करता समाजकारणावर लक्ष देत आपली बांधिलकी जपण्याचे काम सातत्याने करत आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या कृतीमुळे आमचे नेतृत्व भक्कम आहे, हे या घटनेमुळे उदाहरणासह स्पष्ट झाले आहे.
- दीपक सावंत, सरचिटणीस, दक्षिण मुंबई, भाजप
 
 
फडणवीस नेते असल्याचा अभिमान
दीपावलीच्या काळात एका कुटुंबावर जेव्हा अशाप्रकारे आपत्ती येते, तेव्हा काय करायला हवे, याची प्रचिती फडणवीस यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री आणि सर्वसामान्यांचे नेते म्हणून फडणवीसांनी जी काही भूमिका बजावली आहे, ती खरोखरच अभिनंदनास पात्र असून त्यांच्या या कृतीमुळे फडणवीस आमचे नेते असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
- दीपक पाटील, अध्यक्ष, वरळी, भाजप
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.