नवी दिल्ली ( Rishi Sunak ): लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुनक हे इंफोसेसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती आणि भारतीय उद्योजिक व लेखिका सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक ( Rishi Sunak ) आणि लिज ट्रस यांच्यात मागच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत चांगलीच टक्कर दिलेली होती. त्यावेळी सुनक यांच्यावर मत करून ट्रस पंतप्रधान झाल्या परंतु नवीन कर प्रणाली वादात सापडल्याने त्यांना अवघ्या ४५ दिवसात आपले पंतप्रधानपद सोडावे लागले. त्यामुळे ब्रिटनच्या आगामी पंतप्रधानपदासाठी सोशल मिडीयावर पुन्हा एकदा सुनक यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
ऋषी सुनक यांचा प्रवास -
ऋषी सुनक यांचे आजी आजोबा ब्रिटनला गेले होते. १९८० मध्ये सुनक ( Rishi Sunak ) यांचा जन्म हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये झाला. ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या सुनक यांनी स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक ( Rishi Sunak ) यांनी इन्वेस्टमेंट बँक असलेल्या गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी एक गुंतवणूक कंपनीदेखील स्थापन केली होती. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला ऋषी सुनक. मागच्या वर्षी ते रिचमंडमधून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून गेले.अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.
सुनक यांचे कुटुंब -
४० वर्षीय ऋषी सुनक यांचा विवाह भारतातील बंगळूरू येथ २००८ साली नारायण व सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता हिच्याशी झाला. ऋषी आणि अक्षता या दांपत्याला दोन मुली आहेत.
मी हिंदू आहे : ऋषी सुनक
"मी ( Rishi Sunak ) दर विकएंडला मंदिरात जातो. मी हिंदू आहे. मात्र, शनिवारी सेंट गेममध्ये जातो." असे ऋषी सुनक यांनी एका मुलाखतीत म्हंटले होते. त्याच सोबत आपण पहिल्या पिढीचे एनआयआर आहोत. माझे आई-वडील इथे जन्मले नसले तरी ते या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी येथे आले होते असे सुनक ( Rishi Sunak ) म्हणाले होते. लहानपणी आपल्या आपल्यापेक्षा लहान भाव-बहिणीला घेऊन एका रेस्टोरंटमध्ये गेलो असता आपल्याला वंशवादाचा सामना करावा लागला होता. ही एक घटना वगळता आपल्याला ब्रिटनमध्ये वंशवादाचा फारसा त्रास झाला नाही, अशी माहिती एका इंग्रजी वृत्तवाहिनीला सुनक यांनी दिली होती.