जयपूर ( gang rape and murder ) : राजस्थानमधील भरतपूर येथे १७ ओक्टोबर २०२२ रोजी एका महिलेचा बाळाला जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणात नवीन आणि धक्कादायक तथ्य समोर आले आहे. मृत महिलेच्या वडिलांचा दावा आहे की त्यांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. तसेच त्यांच्या मुलीला गोमांस खाऊ घालण्यात आले व जबरदस्तीने नमाज अदा करण्यास भाग पाडले.
याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी इर्शाद, फयाज, वाहीद, उस्मान, अली आणि कासम यांच्याविरुद्ध सिक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, त्यांच्या मुलीचे ९ महिन्यांपूर्वी अपहरण ( gang rape and murder ) करण्यात आले होते. तेव्हापासून ते आपल्या मुलीचा शोध घेत होते. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचा अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यावेळी तिने स्वतःचे अपहरण झाल्याची माहिती दिली होती. इर्शादने त्याच्या साथीदारांसह पिडीतेचे अपहरण केल्याचे सांगण्यात आले. सामूहिक बलात्कारानंतर मयत महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीला गोमांस खाऊ घालून नमाज अदा करण्यास भाग पाडले गेले.
वृत्तानुसार, ( gang rape and murder ) गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहेत. ३६६, ३७६, ३४६, ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृत महिलेचे वडील हरियाणातील झज्जरचे रहिवासी आहेत.
मृत महिला 2021 मध्ये इर्शादच्या संपर्कात आल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर पळून जाऊन तिच्याशी लग्न केले. इर्शाद हा ट्रक चालक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात पोलीस वेगळीच माहिती देत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या वृत्तानुसार तपास अधिकारी रोहित कुमार सांगतात की, ( gang rape and murder )महिलेने दीड वर्षांपूर्वी बेला येथील रहिवासी इर्शादसोबत कोर्ट मॅरेज केले होते. दोघे पती-पत्नी म्हणून राहत होते. शासकीय रुग्णालयात प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.