तुम्ही एक लग्न करता आणि ३ बाया ठेवता!

एमआयएमच्या पदाधिकाऱ्याची हिंदूंंवर चिखलफेक

    15-Oct-2022
Total Views |
शौकत अली
 
 
हैदराबाद : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चा उत्तर प्रदेश अध्यक्ष शौकत अली याने हिंदूंबद्दल घृणास्पद वक्तव्य केले आहे. हिंदू एक लग्न करतात आणि तीन बायका ठेवतात, अशी अलीने हिंदुंवर चिखलफेक केली आहे. राज्यातील एका रॅलीला संबोधित करताना शौकत अली म्हणाला कि, “लोक म्हणतात आम्ही तीन लग्ने केली आहेत. दोन लग्न करूनही आम्ही दोन्ही बायकांना समाजात मान देतो, पण तुम्ही (हिंदू) एकच लग्न करता आणि तीन बायका (रखेल) ठेवता.
 
ओवेसींच्या जवळच्या वर्तुळातील मनाला जाणारा शौकत अली पुढे म्हणाला, “तुम्ही (हिंदू) ना तुमच्या पत्नीचा, ना तुम्ही ठेवलेल्या बाईचा (रखेलीचा) आदर राखता. आम्ही दोन लग्न केले असले तरी आम्ही दोघींना आदर देतो. आणि आमच्या मुलांची नावेही रेशनकार्डवर असतात.
 
शौकत अलीने कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर घातलेल्या बंदीबद्दलही गरळ ओकली तो म्हणाला कि, “देशात कोणी काय घालावे आणि काय घालू नये, हे ठरवण्याचा अधिकार हिंदुत्वाला नाही, ते संविधान ठरवेल. हिजाबच्या नावावर भाजप देश तोडण्याचे काम करत आहे. भाजपच्या इशाऱ्यावर काही लोकांनी मुस्लिमांना लक्ष्य केले आहे. मदरसा, मॉब लिंचिंग, वक्फ आणि हिजाबसारखे मुद्दे उपस्थित केले जात आहेत कारण मुस्लिमांना लक्ष्य करणे सोपे आहे.भाजप जेव्हा कमकुवत असतो तेव्हा मुस्लिमांशी निगडित मुद्दे मांडतो".
 
तर असदुद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी (१४ ऑक्टोबर २०२२) गोलकोंडा किल्ल्यातील रॅलीला संबोधित करताना मुस्लिम मुली हिजाब घालतील आणि ज्याला आवडेल त्यांनी बिकिनी घालावी, असे वादग्रस्त विधान केले होते. ओवेसी म्हणाले होते, “ते म्हणतात की मुस्लिम लहान मुलांना हिजाब घालण्यास भाग पाडत आहेत. खरंच आपण आपल्या मुलींवर जबरदस्ती करतो का? आमच्या मुलींना हिजाब घालू द्या, तुम्हाला हवे असल्यास तुमच्या मुलींना बिकिनी घालू द्या."