भोपाळ ( Medical Course in Hindi) : मध्यप्रदेश सरकारने इंग्रजी भाषेच्या बेड्या तोडून वैद्यकीय शिक्षण हिंदी माध्यमातून ( Medical Course in Hindi) सुरु करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते दि. १६ ऑक्टोबर रोजी भोपाळ येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षाच्या पुस्तकांच्या हिंदी आवृत्त्यांचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेश हे हिंदीमध्ये वैद्यकीय शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने हा क्रांतिकारी निर्णय घेतेला आहे. त्यामुळे आता वैद्यकीय शिक्षण हिंदी माध्यमातून ( Medical Course in Hindi) घेता येणार आहे. "या उपक्रमामुळे लोकांची मानसिकता बदलेल, लोकांना हिंदी माध्यमात शिक्षण घेऊन आयुष्यात प्रगती करता येईल, तसेच आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान वाटेल", असा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. चौहान यांनी यापूर्वी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांतून हिंदीतील उच्च शिक्षणाला पाठिंबा दिला आहे.
"इंग्रजी भाषेबद्दल भारताच्या आकर्षणामुळे देशातील ९५ टक्के प्रतिभावंतांन त्यांच्या आयुष्यात प्रगती साधता आली नाही", अशी खंत गृहमंत्री अमित शाह यांनी ऑगस्टमध्ये भोपाळ भेटीदरम्यान बोलून दाखवली होती.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी हिंदी माध्यमाच्या पुस्तकांचे लोकार्पण हा हिंदी भाषा प्रस्थापित करण्याचा आणि आत्मविश्वास वाढवणारा कार्यक्रम असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे."हा वैद्यकीय नसून भाषा कार्यक्रम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वैद्यकीय शिक्षण हिंदीतून ( Medical Course in Hindi) सुरू करून नव्या युगाची सुरुवात करणार आहेत. "हा जगातील सर्वात अद्भुत आणि अद्वितीय कार्यक्रम बनवण्यासाठी सक्रियपणे कार्य करा", असे आवाहनही चौहान यांनी केले.
१६ ऑक्टोबर रोजी भोपाळ येथील लाल परेड ग्राउंड येथे हिंदी माध्यमातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या उद्घाटना कार्यक्रम पारपडेल त्याची पाहणी करण्यासाठी आलेले असताना चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधला.