पर्यावरण संवर्धनाचे ‘प्रतीक’

    06-Jan-2022   
Total Views | 155

MANSA

पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबवून समाजासाठी पर्यावरण संवर्धनाचे ‘प्रतीक’ बनलेल्या ठाण्यातील प्रतीक वालावलकर या उच्चशिक्षित तरुणाविषयी...
 
ऊच्च शिक्षणानंतर अनेक जण आपल्या करिअरच्या मागे धावतात. पण, सामाजिक दायित्व ओळखून पर्यावरण संवर्धनासाठी झटणारा ३१ वर्षीय प्रतीक वालावलकर हा तरुण युवापिढीसाठी आदर्शवत ठरला आहे. प्रतीकचा जन्म ठाण्यातील, तर बालपण व संगोपन ठाण्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल या त्यांच्या मूळ गावी झाले. मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातून ’पर्यावरणशास्त्र’ या विषयात त्याने ‘एमएससी’ पूर्ण केले. अभ्यासासोबतच गायनकलेचा ध्यास घेतलेल्या प्रतीकला शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, भक्तिसंगीत, भावगीत ऐकण्यात रूची आहे.
 
ठाणे शहरातील रुणवालनगर येथे आई-वडिलांसोबत वास्तव्यास असलेल्या प्रतीकला पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास, यातून पर्यावरण संवर्धनविषयक कामं करण्याची प्रेरणा मिळाली. त्याचे आई-वडीलही पर्यावरणवादी विचारसरणीचे असल्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे संस्कार लहानपणापासूनच त्याच्यावर झाले. ठाण्यातील ’पर्यावरण दक्षता मंडळ’ या संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करत असताना पर्यावरण संवर्धनाशी नाळ जोडली गेल्याने त्याने सर्वप्रथम स्वतःच्या घरातील कचर्‍यापासून जैवखतनिर्मितीचा ध्यास घेतला. वयाच्या २२व्या वर्षी त्याने आपल्या गृहसंकुलात निर्माल्य आणि ओल्या कचर्‍यापासून जैवखतनिर्मितीचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला. त्यानंतर दोनच वर्षांत गृहसंकुलातील पालापाचोळ्यापासून गांडूळखत निर्मिती सुरू केली. त्याच्या या कामाची दखल मुंबईतील ’जलीर्शीींशी ठशीशरीलह र्ऋेीपवरींळेप’ (जठऋ) संस्थेने घेऊन त्याच्या प्रकल्पाला भेट दिली. तसेच, या कामाचा समावेश ’घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर आधारित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ’मुंबईतील विकेंद्रित घनकचरा व्यवस्थापन’ या त्यांच्या शोधनिबंधात केल्याचे प्रतीक सांगतो. मार्च २०२० मध्ये भारत सरकारच्या ’उन्नत भारत अभियाना’अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पाच गावांमध्ये विविध सामाजिक विषयांवर जनजागृतीविषयक उपक्रम राबवण्यात आले. यात ’सेंद्रिय खतनिर्मिती’चे महत्त्व शेतकरी व ग्रामस्थांना पटवून देण्यात प्रतीकचा पुढाकार होता.

 
कचर्‍याच्या दिवसेंदिवस जटील होत जाणार्‍या समस्येवरील उपाय म्हणजे, प्रत्येकाने आपल्या घरात दररोज निर्माण होणार्‍या कचर्‍यापासून घरातच जैवखत बनवावे. ही प्रक्रिया अगदी सहजसोपी आहे. त्याकरिता लोकांना मार्गदर्शन करणे आणि ’सेंद्रिय कचरा खाणारी बादली’ नागरिकांना अल्पदरात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतीक सांगतो. गेल्या सहा वर्षांत त्याने ६१ जणांना अशा बादल्या दिल्या आहेत. यामुळे कचर्‍यासाठी डम्पिंगची गरज उरणार नाही, शिवाय रोगराईचे प्रमाणही घटण्यास मदत होईल. फेसबुकवरील त्याच्या ’हरितछाया’ नावाच्या पेजवर, पर्यावरणसंवर्धनविषयक उपक्रमांविषयी माहिती तो देत असतो. +९१ ९८६९८४१५९८ या ’हरितछाया’च्या क्रमांकावर संपर्क अथवा संदेश पाठवूनही सेंद्रिय कचरा व्यवस्थापनाविषयी नागरिक माहिती मिळवू शकतात. ‘कोविड’ काळातही ’सेंद्रिय कचरा खाणारी बादली’ लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्याने सुरूच ठेवले होते.


कालबाह्य अशा प्रतिगामी, मूलतत्त्ववादी विचारसरणीला चिकटून बसण्यापेक्षा पुरोगामी, उदारमतवादी विचारसरणी अंगीकारून तिचा स्वीकार करणे आणि त्यायोगे धर्मशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र यांचा परस्पर संबंध जाणून त्याप्रमाणे कृती करने, हीच खरी डोळस भक्ती आणि हेच खरं धर्मपालन असल्याचे मानणार्‍या प्रतीकच्या घरी सर्व सण उत्सव पर्यावरणस्नेही साजरे होतात. गणेशोत्सवात पितळेच्या गणेशमूर्तीचे पूजन करून घरच्या घरीच विसर्जन करीत असल्याचे तो सांगतो.गृहसंकुलातील सार्वजनिक गणेशोत्सवात मोठी गणेशमूर्तीदेखील फायबरची आसने, उत्सवाची सांगता झाल्यावर ती मूर्ती पुन्हा काचेच्या कपाटात ठेवली जाते.पर्यावरण संवर्धनविषयक कामे करत असताना मानसन्मान आणि पुरस्कारांची अपेक्षा प्रतीकने कधीच ठेवली नाही. तरीही मुंबई आकाशवाणी तसेच काही वृत्तपत्रांनीही त्याच्या पर्यावरण संवर्धनविषयक कामांची दखल घेतली. ‘ऑल इंडिया रेडिओ’वर त्याच्या दोन मुलाखतीही झाल्याचे प्रतीक सांगतो.
 
 
 
नवीन पिढीला संदेश देताना, “दैनंदिन जीवनातल्या आपल्या कृती या पर्यावरणस्नेही कशा असतील, याकडे लक्ष द्या. पर्यावरणाचा आणखी र्‍हास होऊ न देणे, हेसुद्धा एका अर्थी पर्यावरण संवर्धनाचेच काम आहे,” असे तो सांगतो. पर्यावरणविषयक सामाजिक उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेणारा प्रतीक सध्या जोगेश्वरीस्थित एका गृहसंकुलातील सेंद्रिय कचरा व्यवस्थापन प्रकल्पावर काम करीत असून तेथेही त्यांने कचर्‍यात नंदनवन फुलवले आहे. अशा या उपक्रमशील पर्यावरणसंवर्धनाचे ’प्रतीक’ गणले जाणार्‍या प्रतीक वालावलकर याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.

अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

"पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करू नये"; अमेरिकेनं झापलं! निक्की हॅले यांची पोस्ट चर्चेत

(Nikki Haley) पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा जगभरातून निषेध करण्यात आला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चं समर्थन केले आहे. पाकिस्तानने आता आपण पीडित आहोत असा कांगावा करुन विक्टिम कार्ड खेळू नये, अश्या शब्दांत पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. याविषयी त्यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पाकिस्तानला थेट सुनावले आहे...

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

कर्नल कुरेशी, विंग कमांडर व्योमिकासह परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला! पुराव्यासकट दिली संपूर्ण माहिती – पहा व्हिडिओ

( operation sindoor with evidence ) आपल्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रसामग्री वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेत, आज पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर अनेक शत्रू सशस्त्र ड्रोन उडताना दिसले. आमच्या हवाई संरक्षण तुकड्यांनी शत्रू ड्रोनवर तात्काळ हल्ला केला आणि ते नष्ट केले. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांना धोक्यात आणण्याचा पाकिस्तानचा निर्लज्ज प्रयत्न अस्वीकार्य आहे. भारतीय सैन्य शत्रूच्या योजनांना हाणून पाडेल...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121