दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली! नामर्दांसारखं कार्टून दाखवू नका!

खासदार पूनम महाजन यांचा राऊतांना टोला

    25-Jan-2022
Total Views | 922

Sanjay Raut Raut



मुंबई
: गेली २५ वर्षे भाजप शिवसेना युती सडली असं सांगण्याच्या नादात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेची पातळी घसरली. या संतापजनक प्रकाराला भाजप खासदार पूनम महाजन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली! नामर्दांसारखं कार्टून दाखवू नका!", अशी तिखट प्रतिक्रीया त्यांनी दिली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची २५ वर्षे युतीत सडली, असे वक्तव्य केले. खासदार संजय राऊत यांनीही त्यांचीच री ओढली होती. राऊत यांनी सोमवारी दिवसभर माध्यमांपुढे प्रतिक्रीया देण्याचा सपाटा लावला होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते दिवंगत प्रमोदजी महाजन हेच या भाजप-शिवसेना महायुतीचे शिल्पकार होते याचा सोयीस्कर विसर राऊत आणि ठाकरे यांना पडला.

राऊत यांनी भाजपवर टीका करताना इतकी खालची पातळी गाठली की, राऊत जाणूनबुजून आपण प्रमोदजी महाजन यांचा अवमान केला हे देखील समजले नाही. याच प्रकाराला आता पूनम महाजन यांनी उत्तर दिलं आहे. "स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका.", असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.



नेमकं प्रकरण काय ?


तत्कालीन राजकीय घडामोडींच्या आधारावर आर.के.लक्ष्मण एक व्यंगचित्र रेखाटलं होतं. या व्यंगचित्राचा दाखला राऊत यांनी दिला होता. हे व्यंगचित्र राऊत यांनी ट्विट केलं. सोशल मीडियावर या प्रकाराला आक्षेप घेतल्यानंतर राऊतांनी ट्विट डिलीट केलं.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121