नवी दिल्ली : एकीकडे काही राज्ये ख्रिश्चन मिशनर्यांना रोखण्यासाठी नवनवीन नियम, कायदे आखत आहेत, तर दुसरीकडे तामिळनाडू सरकार मात्र हिंदू मंदिरांना नष्ट करण्याच्या मागे लागल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे. जयमकोंदनमधील रेताई पिल्लैर (गणपती) मंदिर तामिळनाडू सरकारने पाडले. या मंदिराच्या मालकीची ३० एकर जमीन आहे. पाडल्यानंतर लगेचच, सरकारने ही संपूर्ण जमीन मिशनऱ्यांना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने केवळ जमीनच काढून घेतली नाही तर मंदिर चर्चच्या जमिनीवर असल्याचेही सांगितले.
सोमवारी मुदिचूरमधील वरधराजपुरममधील अड्यारजवळील हिंदू मंदिर महसूल अधिकार्यांनी पोलिसांच्या मदतीने पाडले. अतिक्रमणाच्या नावाखाली अधिकाऱ्यांनी मंदिर पाडण्याचा निर्णय घेतला. या बांधकामाला भाविकांनी आक्षेप घेत निदर्शने केली होती. यावेळी मंदिराचे ट्रस्टी रमणिकन यांनी सांगितले की, 'हे मंदिर गेल्या १२ वर्षांपासून आहे. यासाठी अनेक स्थानिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मंदिरासाठी जमिनी दिल्या आहेत.' सध्या अतिक्रमणाच्या नावाखाली मंदिरे पाडली जात आहेत. यावर ते म्हणतात की, "हो, आम्हाला हे मंदिर पुन्हा बांधण्याचे वचन देतात, पण ते किती पाळतात हे अनेकांना माहिती आहे.