'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है!'

"बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है!"

    06-Sep-2021
Total Views | 142

belgum_1  H x W


बेळगाव महापालिका विजयानंतर भाजपकडून शिवसेनेला थेट इशारा


बेळगाव:
बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने ३६ जागा जिंकून बेळगाव महापालिकेत बहुमत मिळवले आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर सोशल मीडियावर 'बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है' असे ट्रेंड होताना दिसत आहेत. त्यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, बेळगाव झांकी आहे की नाही ते माहीत नाही, मात्र मुंबई बाकी आहे हे नक्की आहे, असे म्हणतानाच आता मुंबई महानगरपालिका आम्ही सोडणार नाही, असा संकल्पही त्यांनी व्यक्त केला आहे.



बेळगाव महापालिकेच्या ५८ प्रभागांसाठी शुक्रवारी प्राथमिक अंदाजानुसार ५५ टक्के मतदान झाले होते. मराठी अस्मितेचे दर्शन घडवण्यासाठी मराठी भाषकांनी हिरिरीने मतदानात सहभाग नोंदवला होता. सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेची निवडणूक दोन वर्षांनंतर झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच चिन्हावर उतरले होते. त्यामध्ये भाजपा ५५, काँग्रेस ४५, धर्मनिरपेक्ष जनता दल ११, आम आदमी ३७, एमआयएम ७, अन्य दोन अपक्ष अशा २१७ उमेदवारांचा समावेश होता. या निवडणुकीत ५८ पैकी सर्वाधिक ३६ जागा जिंकून भाजपने महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवला. भाजपच्या या यशामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक वर्षाच्या सत्तेला सुरुंग लागला. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर १० ठिकाणी अपक्षांनी बाजी मारली आहे. इतकेच नाही तर एक जागा जिंकत एमआयएमनेही बेळगावमध्ये आपले खाते खोलले आहे. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले," भाजपचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी २२ हे मराठी आहेत. याचा अर्थ मराठी भाषिकांनी भाजपला स्वीकारलं शिवसेनेला नाकारलं. हेच मुंबईत होईल, असा इशारा चंद्रकांतदादा पाटील यांनी संजय राऊत आणि शिवसेनेला दिला आहे.

बेळगाव मध्ये जाऊन भाजपा विरोधात वाचाळ बडबड करणारे संजय राऊत यांच्या शिवसेनेला बेळगाव च्या जनतेने कात्रजचा घाट दाखवला..!

जनतेने शिवसेनेच्या वायफळ प्रांतवादाला लाथाडून राष्ट्रवाद जिंकवला. जय श्रीराम!

- राम सातपुते, भाजप आमदार

आज बेळगाव महापालिकेवर "भगवा" फडकला ..

उद्या तोच "भगवा" मुंबई महापालिकेवर वर फडकणारच !

- नितेश राणे, भाजप आमदार
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121