रायगड जिल्ह्याच्या 'जिल्हा पक्षी' म्हणून 'तिबोटी खंड्या'ची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Sep-2021   
Total Views |
odk_1  H x W: 0
(छायाचित्र - युवराज मराठे)


मुंबई -
रायगड जिल्ह्याच्या जिल्हा नियोजान समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या पक्षी म्हणून तिबोटी खंड्या (oriental dwarf kingfisher) या पक्ष्यांची घोषणा करण्यात आली आहे. अमरावती, कोल्हापूरनंतर जिल्हा पक्षी घोषित करणारा रायगड हा तिसरा जिल्हा आहे. तिबोटी खंड्या हा सह्याद्रीमध्ये स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
 
 
पाऊसाची चाहूल लागल्यानंतर साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सह्याद्रीमध्ये आकर्षक अशा तिबोटी खंड्या पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते. रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्य या पक्ष्याचे नंदनवन आहे. म्हणूनच रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी म्हणून तिबोटी खंड्याची घोषणा करण्यात आली आहे. सोमवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन बैठकीनंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली. पक्षाच्या तळव्याला तीन बोटे असल्याने याला 'तिबोटी खंड्या' असे म्हणतात. रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित केल्याने या पक्ष्याचे जतन आणि संवर्धन करण्याकरिता मदत होणार आहे.
 


भारतात आढळणाऱ्या खंड्या पक्ष्यांच्या प्रजातींमधील तिबोटी खंड्या हा आकाराने सर्वात लहान खंड्या आहे. या पक्ष्यांच्या समावेश स्थलांतरित पक्ष्यांमध्ये होत असला तरी तो केवळ प्रजननासाठी सह्याद्रीमध्ये येतो. त्यानंतर सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्याच्या दरम्यान पुन्हा दक्षिण भारताच्या दिशेने स्थलांतर करतो. त्यांच्या विणीचा काळ अत्यंत नाजूक मानला जातो. कारण, याच कालावधीत हे पक्षी प्रजनन करुन आपली संख्या वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. गलात ओढा, तलाव, मातीच्या कड्यात जिथे जमीन भुसभुसीत असेल तिथे तिबोटी खंड्या मातीमध्ये बीळ खोदून आपले घरटे तयार करतो. सर्वसाधारणपणे नदी, ओढे यांच्या वरच्या बाजूस कडेला असणाऱ्या मातीमध्ये हे पक्षी बीळ खणून त्यामध्ये आपले घरटे तयार करतात. हा पक्षी त्याचा आकार व चमकदार रंगामुळे वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. कपाळावर काळा डाग, मानेच्या बाजूला निळा आणि पांढरा रंग, पंख गडद निळ्या व काळ्या रंगाचे असतात. मानेवरील भाग पिवळसर केशरी असतो. चोच पिवळसर नारंगी रंगाची असून शेपटी नारंगी गुलाबी असते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@