केरळमध्ये जहाल मुस्लीम मोठ्या प्रमाणात हातपाय पसरत आहेत. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही संघटना तर उघडपणे हिंदूविरोधी भूमिका घेत आहे. या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये जे वक्तव्य केले गेले ते पाहता, `१९२१ साली जहाल मुस्लिमांची जी मानसिकता होती ती २०२१ मध्येही कायमच असल्याचे दिसून येते.
आपल्या देशातच नव्हे, तर जगातील विविध भागांत इस्लामी दहशतवाद हातपाय पसरत आहे. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानी राजवट प्रस्थापित झाली हे त्याचेच द्योतक. या तालिबानी राजवटीने आपले भीषण, क्रूर रूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. आज २१व्या शतकात इस्लामी दहशतवाद पसरत चालला असल्याचे दिसत असले तरी गेल्या शतकातही केरळमध्ये मोपला मुसलमानांनी तेथील हिंदू समाजावर भीषण अत्याचार केले होते, हा इतिहास विसरता येणार नाही! केरळमधील डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी, मुसलमानांनी हिंदू समाजाचे जे हत्याकांड झाले, त्यास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. जमीनदार विरुद्ध शेतकरी, शेतमजूर अशा वर्गसंघर्षातून सदर हत्याकांड झाल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, प्रत्यक्षात केरळमध्ये मुस्लिमांकडून हिंदू समाजावर जे अत्याचार करण्यात आले, त्याचा हेतू वेगळाच होता. पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानमधील ऑटोमन साम्राज्य दुभंगल्यानंतर मुस्लिमांचा नेता समजणार्या खलिफावर निर्बंध लादण्यात आले होते. त्याविरुद्ध आणि पुन्हा खलिफाचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिश राजवटीत भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ हाती घेतली होती. या खिलाफत चळवळीला गांधीजी आणि काँग्रेसने पाठिंबाही दिला होता. खिलाफत चळवळीला पाठिंबा म्हणजे ब्रिटिशांना भारतातून घालवून देण्याच्या लढ्याला हिंदू-मुस्लिमांचा पाठिंबा, असा विचार करून गांधीजींनी त्या चळवळीस पाठिंबा दिला होता. खिलाफत चळवळीच्या निमित्ताने ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी हिंदू आणि मुस्लीम एकत्रित आल्याचे चित्रही रंगविण्यात आले.
जरा थोडे मागे जाऊन इतिहासावर नजर टाकल्यास टिपू सुलतानाच्या राजवटीत मलबारमधील हिंदूंना तेथून अक्षरश: पळवून लावण्यात आले. तेथील हिंदूंच्या जमिनी मुस्लिमांनी बळकावल्या आणि ते जमीनदार झाले. टिपू सुलतानाच्या लष्कराकडून हिंदू समाजावर केले जात असलेले अनन्वित अत्याचार लक्षात घेऊन मलबार आणि केरळच्या उत्तर भागातून हिंदू समाजाने आपली संपत्ती, जमिनी सोडून अन्यत्र आश्रय घेतला. टिपू सुलतानाने तेथील हिंदूंच्या जमिनी मोपला मुस्लिमांना वाटून टाकल्या. पण, १७९२ मध्ये टिपू सुलतानाचा पराभव झाल्याने त्याने मलबार सोडले. टिपू सुलतान तेथून निघून गेल्यानंतर जे हिंदू निघून गेले होते ते पुन्हा परतले आणि त्यांनी आपल्या जमिनी आणि संपत्तीवर हक्क सांगितला. त्यातूनच त्या भागात हिंदू-मुस्लीम समाजात संघर्षाची बीजे रोवली गेली. १७९२ ते १९२१ या कालावधीत मलबार भागात हिंदू समाजाच्या विरुद्ध मोठ्या स्वरूपाच्या ८२ दंगली झाल्या. १७९२ पासूनच मलबारमध्ये हिंदूंचे हत्यासत्र सुरूच होते.हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील संघर्षाची ही बाजू लक्षात घेतली की, मुस्लीम समाजाने हिंदू समाजावर हल्ला करण्यासाठी खिलाफत चळवळीचे निमित्त का शोधले ते लक्षात येईल. काँग्रेसने केरळमधील मुस्लिमांची ही मानसिकता लक्षात न घेताच तेथील चळवळीस पाठिंबा दिला. त्यामुळे या चळवळीत सहभागी झालेल्या जहाल मुस्लिमांच्या हाती आयते कोलीत मिळाले. खिलाफत चळवळीचे नेते आणि काँग्रेस यांच्यामध्ये १९२० मध्ये समझोता झाल्यानंतर लगेचच म्हणजे २० ऑगस्ट, १९२० रोजी मोपला मुस्लिमांकडून निरपराध हिंदूंवर भीषण हल्ला झाला. या खिलाफत चळवळीचे निमित्त करून मोपला मुस्लिमांना मलबार भागात खिलाफत राजवट अस्तित्वात आणायची होती. त्यादृष्टीने त्यांची पावलेही पडू लागली होती. केरळमधील खिलाफत चळवळीचे नेतृत्व करीत असलेल्या कुंज अहमद हाजी याने ‘अल-दौला’ म्हणजे एक स्वतंत्र इस्लामिक प्रदेश घोषित केला आणि त्या भागातील हिंदू समाजावर ‘जिझिया’ करही लादला.
केरळमध्ये मोपला मुस्लिमांनी सुमारे दहा हजार हिंदूंची नृशंस हत्या केली. त्यातील एक घटना घडली २५ सप्टेंबर, १९२१ या दिवशी. तीन दिवसांपूर्वीच या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली. हिंदू समाज ती घटना विसरू शकत नाही. डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी इतिहासाचे विकृतीकरण केल्याने हा इतिहास सर्वांसमोर आलेला नाही. पण, या घटनेची माहिती हिंदू समाजास असणे आवश्यक आहे. उत्तर केरळमधील थुवूर आणि करुवायाकंदी या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या एका टेकडीच्या उतारावर खिलाफत चळवळीचा नेता चाम्बराशेरी यम्बीची कोइथंगल याने आपल्या चार हजार समर्थकांची सभा आयोजित केली होती. त्या सभेच्या दरम्यान ४० हिंदूंचे हात पाठीमागे बांधून त्यांना त्या ठिकाणी आणण्यात आले होते. त्यांच्यावर ब्रिटिशांना मदत केल्याचे आरोप ठेवण्यात आले. त्यातील काहींना गोळ्या घालण्यात आल्या, तर बाकीच्यांची विहिरीच्या काठावर नेऊन एकापाठोपाठ एक अशी हत्या करण्यात आली आणि त्यांची प्रेते त्या विहिरीत फेकून देण्यात आली. खिलाफत आंदोलनाचे निमित्त करून मलबारमधील हिंदू समाजावर तेथील जहाल मुस्लिमांनी कसा सूड उगवला, याचे हे एक उदाहरण झाले. त्या भीषण आणि थरकाप उडवून देणार्या घटनेस नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाली. मोपला मुस्लिमांनी केरळच्या मलबार भागात हिंदू समाजावर किती भीषण अत्याचार केले असावेत, त्याची कल्पना यावरून येते.
मोपल्यांनी केलेल्या हत्याकांडास १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, मोपल्यांच्या नरसंहाराचे डाव्या इतिहासकारांनी जी विकृत मांडणी केली, त्यावर सडकून टीका केली. शेतकर्यांच्या उठावातून हे हत्याकांड झाल्याचे तारे डाव्या इतिहासकारांनी तोडले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मोपल्यांच्या अत्याचारांवर झगझगीत प्रकाश टाकला होता, याकडेही योगी आदित्यनाथ यांनी लक्ष वेधले. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आपल्या एका पुस्तकात मोपल्यांनी केलेल्या अत्याचारांचा उल्लेख करून त्याचा निषेध केला होता. अॅनी बेझंट यांनीही आपल्या एका पुस्तकात मोपल्यांनी केलेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे.केरळमध्ये जहाल मुस्लीम मोठ्या प्रमाणात हातपाय पसरत आहेत. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही संघटना तर उघडपणे हिंदूविरोधी भूमिका घेत आहे. या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये जे वक्तव्य केले गेले ते पाहता, १९२१ साली जहाल मुस्लिमांची जी मानसिकता होती ती २०२१ मध्येही कायमच असल्याचे दिसून येते. त्यामध्ये जे वक्तव्य करण्यात आले ते असे होते. “हमने जो तलवार उठायी थी १९२१ में, वो हमने समुंदर में फेकी नहीं। वो अभी भी हमारे हाथ में हैं।” १९२१ची आणि १०० वर्षांनंतरची जहाल मुस्लिमांची मानसिकता बदलली नसल्याचेच यावरून दिसून येते. पण, अजूनही हे अनेकांच्या लक्षात येत नाही. या जहाल तत्त्वांचा धोका वेळीच ओळखण्याची आवश्यकता आहे.