सुशिक्षित देशांनी भारताच्या नादी लागू नका : आफ्रीदी

पाक क्रिकेटपटूचा इंग्लंड, न्यूझीलंडला सल्ला

    26-Sep-2021
Total Views |

Afridi _1  H x
 
 
 

इस्लामाबाद : पाकिस्ताानातील राजकारणात सक्रीय होण्यासाठी आतूर असलेल्या क्रिकेटपटू शाहिद आफ्रीदीने आता भारतविरोधी प्रतिक्रीया देण्यास सुरुवात करून चर्चेत राहण्याचा नवा फंडा शोधला आहे. आता तर भारताच्या नादी इतर देशांनी लागू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे. न्यूझीलँडने पाकिस्तानच्या विरोधात पहिल्या सामन्याला केवळ ३० मिनिटे शिल्लक असताना अचानक दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तीळपापड झालेल्या पाकिस्तानी क्रीकेटपटूंनी वारंवार भारताविरोधात वक्तव्य केली आहेत.
 
 
 
पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमी नाराज आहेत. माजी क्रिकेटपटू नाराज आहेत. अनेकांनी याला आयपीएल कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही यात सुर मिसळला. आफ्रिदी वारंवार भारताविरोधी वक्तव्य करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. यावेळी तो म्हणतो, "न्यूझीलँड आणि इंग्लंडच्या या निर्णयाविरोधात भारताचाच हात आहे, जगातील सुशिक्षित देशांनी भारताच्या नादी लागू नका, त्यांनी आपले निर्णय स्वतः घ्यायला शिका, असा सल्ला त्याने दिला आहे. एक देश आमच्या विरोधात आहे याचा अर्थ असा नव्हे की, इतर देशांनीही तसेच करायला हवे."
 
  
 
धमकी दिल्यावरही केला भारत दौरा
 
आफ्रिदी म्हणाला की, आम्हाला भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानच्या संघालाही धमक्या मिळाल्या होत्या. त्यानंतरही आम्हाला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दौऱ्यावर जा असे सांगितले होते. आम्हाला क्रिकेट संबंध दृढ करायचे आहेत, असे बोर्डाने त्यावेळी सांगितले होते.
 
 
 
आम्हाला सांगायला हवे होते!
आफ्रिदी म्हणाला, न्यूझीलंडला जर धमक्या मिळत होत्या तर याची माहिती किमान पाकिस्तानला द्यायाला हव्या होत्या. त्यांनी अशाप्रकारे एककल्ली निर्णय घ्यायला नको होता. हा माफी योग्य निर्णय नाही. न्यूझीलंड संघाला पूर्णपणे सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. तसेच त्यामुळे संघ समाधानीही होता. असे काय झाले ज्यामुळे दौरा रद्द करण्यात आला?, असा प्रश्न त्याने विचारला आहे.