मुंबई : मुंबई विद्यापीठाच्यावतीने नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासना’च्या अभ्यास मंडळावर नामनिर्देशित सदस्य म्हणून सा. ‘विवेक’चे सहकार्यकारी संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र गोळे यांचा अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.