छत्तीसगढमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांविरुद्ध निदर्शने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Sep-2021   
Total Views |

chatisgarh_1  H

छत्तीसगढ राज्यामध्ये पैशाची आणि अन्य प्रकारची प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्याचे प्रकार घडत आहेत. धर्मांतराचे हे प्रकार लोकसंख्येचे प्रमाण बदलण्याच्या हेतूने पद्धतशीरपणे सुरू असल्याचे राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. केवळ धर्मांतराचेच प्रकार वाढले आहेत, असे नाही तर ‘लव्ह जिहाद’च्या घटनाही या राज्यात आढळून येत आहेत.

छत्तीसगढ राज्यामध्ये धर्मांतराच्या वाढत्या घटनांच्या विरोधात हिंदू समाजाने राजधानी रायपूरमध्ये अलीकडेच एक मोठा मोर्चा काढला होता. सर्व सनातन हिंदू महापंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारो हिंदू सहभागी झाले होते. या निदर्शनानंतर लखेननगर या मोर्चाच्या स्थानापासून ६०० वर्षे प्राचीन वैजनाथ मंदिरापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या जनतेला आमिषे दाखवून त्या समाजाचे धर्मांतर करण्याचे प्रकार करणार्‍या ख्रिस्ती धर्मगुरूंविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या मोर्चाच्या वतीने राज्य शासनास करण्यात आली. तसेच राज्यामध्ये ‘लव्ह जिहाद’सारख्या प्रकारांना प्रोत्साहन देणार्‍या घटनांना पायबंद घालण्यासाठी शासनाने कडक कायदे करावेत, अशी मागणीही या मोर्चाच्या वतीने करण्यात आली. छत्तीसगढच्या राज्यपाल अनसूया उईके यांना मोर्चाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे छत्तीसगढ राज्यातील बहुतांश सर्व विभागामध्ये नियमित रूपाने धर्मांतराच्या ज्या घटना घडत आहेत, त्याकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले.

छत्तीसगढ राज्यामध्ये पैशाची आणि अन्य प्रकारची प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्याचे प्रकार घडत आहेत. धर्मांतराचे हे प्रकार लोकसंख्येचे प्रमाण बदलण्याच्या हेतूने पद्धतशीरपणे सुरू असल्याचे राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. केवळ धर्मांतराचेच प्रकार वाढले आहेत, असे नाही तर ‘लव्ह जिहाद’च्या घटनाही या राज्यात आढळून येत आहेत. संघटित गुन्हेगारीच्या रूपामध्ये काही धार्मिक संघटना आणि स्थानिक धार्मिक नेते ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप या निवेदनामध्ये करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांनी ‘लव्ह जिहाद’विरुद्ध जसे कायदे केले, तसा कायदा छत्तीसगढ राज्यानेही तातडीने करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रायपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य मोर्चात हिंदू समाजातील अनेक घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यात तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांचा समावेश होता. केवळ रायपूरमध्येच अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. तर धर्मांतराच्या प्रकारांविरुद्ध राज्याच्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते.
 
गेल्याच आठवड्यात ‘हिंदू युवा मंच’ या संघटनेच्या वतीने दुर्ग येथेही अशाच निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. धर्मांतराच्या प्रकारांना प्रतिबंध बसावा, या हेतूने जिल्हास्तरांवर समित्यांची निर्मिती करण्यात यावी. तसेच धर्मांतरास प्रवृत्त करणार्‍या आणि सनातन धर्माबद्दल चुकीचा प्रचार करणार्‍या व्यक्ती वा समाज यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.छत्तीसगढमधील वनवासी क्षेत्रांमध्ये धर्मांतराचे प्रकार कित्येक वर्षांपासून घडत आहेत. तसेच तेथील वनवासी समाजाने आपली ओळख हिंदू म्हणून करून देऊ नये, असे प्रयत्नही केले जात आहेत. पण, त्या राज्यातील हिंदू समाजाने आता धर्मांतराच्या घटनांविरुद्ध आवाज उठविला आहे. हिंदू समाजाने संघटित होऊन ख्रिस्ती धर्मप्रसारकांविरुद्ध आवाज उठविला, तर धर्मांतराचे प्रकार नक्कीच बंद पडतील. तसेच ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करून त्यास पायबंद घालण्यासाठी त्वरित कायदा करण्याची हिंदू समाजाची मागणीही रास्त आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांसारखे कायदे केवळ छत्तीसगढमध्येच नव्हे, तर देशातील अन्य राज्यांनीही करायला हवेत.

उत्तर प्रदेशमधील पाच हजार मदरसे बंद!


उत्तर प्रदेशामध्ये विद्यमान असलेल्या विविध मदरशांची त्या राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने चौकशी केली असता अनेक मदरशांच्या कारभारांमध्ये अनियमितता असल्याचे आढळून आले. अनेक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील पाच हजार मदरसे बंद करून टाकले. उत्तर प्रदेश अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य असलेले सुरेश जैन यांनी सांगितले की, “अनेक मदरशांकडून वेळोवेळी जी माहिती उत्तर प्रदेश मदरसे शिक्षण मंडळाच्या पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असते, ती अशा अनेक मदरशांकडून अपलोड केली जात नसल्याचे आढळून आले. असे बेकायदेशीर मदरसे बंद केल्याने राज्य सरकारचे १०० कोटी रुपये वाचणार आहेत.”
 
उत्तर प्रदेशातील आझमगढ आणि मिर्झापूर या जिल्ह्यांतील मदरसे केवळ कागदावरच आहेत. त्यांच्यावर राज्य सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च होत होते. अशा अनेक मदरशांची विशेष चौकशी पथकाकडून करण्यात आली. आझमगढ आणि मिर्झापूर जिल्ह्यांतील अशा २१ मदरशांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. २००९-१० साली बसप नेत्या मायावती या मुख्यमंत्री असताना अनेक मदरशांची खातरजमा न करता त्यांना सरकारने मान्यता दिली. मुस्लीम समाजाची मते आपल्याला मिळावीत, या हेतूनेच असे करण्यात आल्याचे उघड आहे. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्या कारकिर्दीमध्येही सरकारचा अशा मदरशांवर वरदहस्त होता. पण, योगी आदित्यनाथ सरकारने अशा बोगस मदरशांची चौकशी सुरू केल्यानंतर त्याद्वारे सत्य उघड झाले. कोणाचेही तुष्टीकरण करायचे नाही, असा ठाम निर्धार केलेल्या योगी आदित्यनाथ सरकारने पाच हजार मदरसे बंद करण्याचा निर्णय घेऊन सर्व राज्यांना अनुकरणीय उदाहरण घालून दिले आहे!
 
 
रामानुजाचार्य यांचा २१६ फूट उंचीचा भव्य पुतळा!
 
हैदराबादजवळ संत रामानुजाचार्य यांचा भव्य असा २१६ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. हा पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ या नावाने ओळखला जाणार आहे. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. महंत चिन्न जियार स्वामी यांनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. वैष्णव संप्रदायाचे रामानुजाचार्य हे भक्ती चळवळीचे प्रणेते होते. संत रामानुजाचार्य यांनी सर्व प्रकारच्या भेदभावाविरुद्ध समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य केले. जातीपातीवरून केला जाणारा भेदभाव; तसेच स्त्री-पुरुष भेदभावाविरुद्ध त्यांनी जनजागृती केली. रामानुजाचार्य यांच्या जन्म १०१७ मध्ये तामिळनाडूमधील श्रीपेरम्बुदूर या गावी झाला. भारतीय समाजजीवन अभ्यासण्यासाठी त्यांनी भारत भ्रमण केले होते. वेदांचे सार सांगणार्‍या ग्रंथांची रचना त्यांनी केली. समाजात समानता प्रस्थापित झाली पाहिजे, यासाठी समाजजागृती करण्याचे कार्य करणार्‍या रामानुजाचार्य यांचे हैदराबादजवळ उभारण्यात येत असलेले भव्य स्मारक सर्व भारतीयांना प्रेरणा देणारे ठरेल. या पुतळ्यासाठी 38 एकरांचा भव्य परिसर विकसित करण्यात येणार आहे.









 


 
@@AUTHORINFO_V1@@