टोकियो ऑलिम्पिक २०२१ : भारताच्या नीरजची 'गोल्डन' कामगिरी

    07-Aug-2021
Total Views |

neeraj_1  H x W
टोकियो : सर्वांच्या अपेक्षेवर खरा उतरत भारताच्या नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२१चे पहिले सुवर्ण पदक पटकावले. त्याने सर्वाधिक ८७.५८ मीटर अंतर पार केले. पहिल्या दोन प्रयत्नात त्याने अनुक्रमे ८७.०३ मी. आणि ८७.५८ अशी कामगिरी केली. त्यानंतर अखेरच्या प्रयत्नांपर्यंत तो पहिल्याच स्थानावर राहिला. त्याने केलेय या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून भारताचे हे पहिलेच सुवर्ण पदक आहे. याआधी भारताने २ रौप्य आणि ३ कांस्य पटकवले होते. सध्या भारताच्या नावावर ७ पदके आहेत.
 
 
 
२२ नीरजने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत स्थान मिळवले. त्याने पात्रता फेरीत ८६.६५ मीटर एवढे अंतर पार करत अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यानंतर भारताच्या नावावर पहिले सुवर्ण पदक पटकावले. अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपली असून १३ वर्षानंतर भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिक नेमबाज अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळाले होते. बिंद्राने १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे हे आतापर्यंतचे 10 वे सुवर्णपदक आहे. भारताने यापूर्वी हॉकीमध्ये ८ आणि नेमबाजीमध्ये १ सुवर्णपदक जिंकले आहे. अशा प्रकारे, हे भारताचे केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे.