दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पॅरा धावपटू सुमित अंतिल यांचे ट्विटरवर अभिनंदन केले. यावेळी त्यांनी आपल्या पुरोगामी अजेंड्यानुसार सुमितचा फोटो कापून शेअर केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले.
गांधी यांनी ट्विट करुन सुमित याचे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले. ट्विटसोबत त्यांनी जो फोटो जोडला आहे, तो आपल्या अजेंड्यानुसार क्रॉप केला आहे. वास्तविक, गांधी यांनी सुमितने गळ्यात घातलेल्या 'ओम'च्या साखळीचा फोटो कापून शेअर केला आहे. ज्याठिकाणी साखळीत 'ओम'चे चिन्ह आहे, त्याठिकाणीच तो कापून गांधी यांनी तो ट्विट केला आहे. असे केल्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी स्वतःला कौल दत्तात्रेय गोत्राचे 'जनेधारी ब्राह्मण' आणि शिवभक्त म्हणून सांगत आले आहेत.
गांधी यांनी सुमितचा कापून टाकलेल्या फोटोचा आॅरिजनल फोटो शेअर करायला नेटकरी विसरले नाहीत. नेटकऱ्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुमितने 'ओम' चिन्ह असलेली साखळी आपल्या गळ्यात घातली आहे. "तुम्ही फोटो क्रॉप कराल, पण जे खेळाडू भाग घेतात आणि पदके आणतात ते सर्व देवाचे आणि देशाचे भक्त असतात." त्यांचे विचार, भावना क्रॉप करू शकत नाही ... सर्वत्र लहान मानसिकता दाखवणे आवश्यक आहे का? ”, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली की, राहुल गांधी फोटोतून 'ओम' काढू शकतात. पण ते खेळाडूंच्या हृदयातून हिंदू धर्म काढून टाकू शकणार नाहीत.