Custom Heading

तेल उत्खननात 'आत्मनिर्भरता' शक्य!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2021
Total Views |
MEIL _1  H x W:



एमईआयएलच्या नव्या स्वदेशी तंत्रज्ञानांमुळे सुरक्षित, वेगवान तेल उत्खनन शक्य

मुंबई : 'मेघा इंजीनियरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड'ने (MEIL) स्वदेशी अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारित 'ऑईल ड्रिलिंग रिग' नुकतीच 'ओएनजी'कडे सुपुर्द केली. या नव्या ड्रिलिंग रिगमुळे ऑइल आणि गॅसचे उत्पादनाचा वेग तर वाढतोच शिवाय अधिक सुरक्षित प्रणाली असल्याने खर्चातही बचत होणार आहे. संपूर्ण प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप मर्यादित झाल्याने तेल उत्खनन सुरक्षित आहे, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.

'मेघा इंजिनियरिंग अॅण्ड इंफ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड' (MEIL) उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी म्हणाले, " 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' या योजना यशस्वी करायच्या असतील तर इंधन आयातीचे प्रमाण कमी झाले पाहिजे. एमईआयएलने या क्षेत्रातील मोलाचा वाटा उचलला आहे. देशार्तगत तेल उत्पादनात वाढ आणि देशाचे भविष्य अधिक उज्वल करण्यासाठी परकीय चलनात बचत यात महत्वाची भूमिका वठवताना आम्हाला अभिमान वाटतो."

एमआयआयएलचे मुख्य अधिकारी (तेल उत्पादन रिग्ज डिव्हिजन) एन. कृष्णकुमार यांनी या प्रकल्पाची माहिती देत सांगितले की, "आतापर्यत भारत तेल उत्पादन करणाऱ्या रिग आयात करत होता, परंतु एमईआयएलने देशार्तग रिग बनवण्याची क्षमता वाढवत तेल आणि गॅस उत्पादन रिग स्वस्त, सोपे आणि सुरक्षित बनवल्या आहेत. हे तंत्रज्ञान आता तेल आणि गॅस उत्खनन अधिक वेगवान बनवते."

ओएनजीसीकडे सुपुर्द करण्यात आलेली दूसरी रिग हाइड्रोलिक आणि सॉफ्टवेयर तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणेवर काम करते. तिची क्षमता पंधराशे हॉर्स पॉवर इतकी आहे. याचा फायदा ओएनजीसीलाच होईल, असा दावा कंपनीने केला आहे. ही रिग ओएनजीसी अहमदाबादातल्या कलोलजवळ धमासना गावात GGS- IV तेल क्षेत्रात कार्यरत होणार आहे.

ही ड्रिलिंग रिग जमीनीखाली चार किलोमीटर पर्यंत खोदकाम करु शकते, तसेच ४० वर्षांपर्यंत सुस्थितित कार्यरत असू शकते. गरजेप्रमाणे दुसरीकडे स्थलांतरितही करता येऊ शकते. अत्याधूनिक तत्रज्ञानावर आधारीत सुरक्षा मानकाची पुर्तता करणारी ही रिग निश्चितच भारताच्या भविष्यकालिन गरजा पुर्ण करणारी आहे. एमईआयएलला २०१९मध्ये ओएनजीसीतर्फे अशा ४७ ड्रिलिंग रिग बनवुन देण्याची ऑर्डर मिळाली आणि पुढच्या ३५ महिन्यांच्या आसपास या सर्व रिग ओएनजीला पुरवण्यात येतील.


MEIL _1  H x W:


जमिनीवरील तेल उत्खननासाठी आवश्यक ऑईल रिगचा फायदा भविष्यात तेल उत्पादन क्षेत्रासाठी मोठा फायदा होईल. कमी आकारमान यामुळे किफायतशीर ठरेल. तेल कंपन्यांना याचा फायदा होईल. हे तंत्रज्ञान जरी परकीय असले तरीही याद्वारे कंपन्यांचे परकीय चलन वाचते.
- कुमार एन. के., ऑईल रिग विभाग प्रमुख



@@AUTHORINFO_V1@@

Custom Heading

जरुर वाचा
तुला घाबरण्याची गरज नाही..., शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

"तुला घाबरण्याची गरज नाही...", शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा केल्याप्रकरणी मध्य प्रदेश मंत्र्याने पत्राद्वारे शमीला दिला धीर

Mohmmed Shami टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने उपवास सुरू असताना पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान ज्यूस प्यायल्याने त्याला एका मौलवीने इस्लामचा धर्म भ्रष्ट केल्याप्रकरणी टीका केली. उपवास सुरू असतानाही तो ज्यूस पित होता. त्याने उपवास पाळल्यावरून काही धर्मांधांनी त्याला धारेवर धरले. त्यानंतर आता त्याच शमीच्या लेकीने धुलीवंदन सणाचा आनंद घेतल्याने टीका करण्यात आली. यामुळे आता मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे..