भाजप कार्यालयाची तोडफोड करणा:या शिवसैनिकांना अटक करा भाजपची मागणी

शिवसैनिकांच्या निषेधार्थ भाजपचे शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन

    24-Aug-2021
Total Views |

 
 
 
 
bjp aandolan photo_1  

कल्याण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी भाजपचे कल्याण शहर कार्यालय तोडले. त्यावर संतप्त झालेल्या भाजपने बाजारपेठ पोलिस ठाणे ते शिवाजी चौकार्पयत मोर्चा काढला. तसेच शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. ज्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे त्यांना अटक करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप पदाधिका:यांनी पोलिसांना दिला आहे.

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर आणि शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांच्यासह शिवसेना कार्यकत्र्यानी भाजप कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी भाजप कार्यकर्ते प्रसाद टूमकर यांना शिवसैनिकांनी शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. हा प्रकार समजताच भाजप कार्यकर्ते बाजारपेठ पोलिस ठाण्यात जमले. त्यांनी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. भाजपच्या मागणीनंतर पोलिसांनी टूमकर यांना वैद्यकीय तपासणी करण्यास नेण्याचा प्रयत्न केला. मात्र टूमकर यांनी त्याला नकार दिला.

भाजप मात्र जश्यास तसे उत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. भाजप कडून ही शिवसेना शाखेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे याची कुणकुण पोलिसांना लागली होती. संतप्त झालेल्या भाजपने बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून शिवाजी चौकार्पयत मोर्चा काढला. पोलिसांच्या उपस्थितीत शिवसैनिक मारहाण करतात. पोलिस त्यावेळी झोपले होते की काय? असा सवाल ही भाजप पदाधिका:यांनी केला.

भाजपचा मोर्चा दरम्यान टिळकनगर शिवसेना शाखेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र मोर्चा पार नाक्यावरून शिवाजी चौकाच्या दिशेने गेला. तेव्हा शिवाजी चौकात शिवसेना शाखा तोडण्याची कुजबुज भाजप कार्यकत्र्यामध्ये होती. पोलिसांनी शिवाजी चौकात भाजपाचा मोर्चा अडविला. यावेळी भाजपने शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी कार्यकत्र्याना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेविका वैशाली पाटील, महिला आघाडीच्या प्रिया शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रेमनाथ म्हात्रे म्हणाले, भाजप कार्यालयावर शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा भ्याड हल्ला आहे. ‘हल्ला करण्याआधी आवाज द्या आणि मग हल्ला करा’ त्यावेळी तुम्हाला भाजपाची ताकद काय आहे ते समजेल. भाजप कार्यकर्ते आज जरी शांत असले तरी उद्या असतीलच असे नाही. उद्या काय होईल याची जबाबदारी पोलिसांची असेल. भाजप उद्या आक्रमक झाली तर मग त्यांनी कायदा हातात घेतला असे बोलू नका असे सांगितले.
 
 
-----------------------------------------------------------