नवी दिल्ली : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी रविवारी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेट म्हणून २,६०० किलोग्रॅम आंबा पाठवला.रंगपूर जिल्ह्यात पिकविल्या जाणार्या हरिभंगा जातीचे आंबे बेनापोल चेकपोस्ट मार्गे जमिनीच्या सीमा ओलांडून पाठविण्यात आले. बेनापोल कस्टम हाऊसचे उपायुक्त अनुपम चकमा यांनी बांगलादेशी माध्यमांना सांगितले की, आंबे हा दोन देशांमधील मैत्रीचा स्मृतिचिन्ह आहे.
कोलकाता येथे बांगलादेशच्या उप-उच्चायोगाचे पहिले सचिव, मोहम्मद समिउल कडर यांना आंबे मिळाले, जे नवी दिल्लीतील पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठविले जातील.सीमाशुल्क व बंदराची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर रविवारी दुपारी २६० कार्टोंचा आंबा घेऊन जाणाऱ्या बांगलादेशी ट्रकने सीमा पार केली. सीमेवर बेनापोल नगरपालिकेचे महापौर अशरफुल आलम लिटन यांच्यासह बांगलादेशी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बांगलादेशी माध्यमांतील वृत्तानुसार, हसेना आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या ईशान्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आंबे पाठवण्याचा विचार करीत आहेत. या सर्व देशांची सीमा बांगलादेशशी आहे.