चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यासामोर मांडलेली भूमिका योग्यच
चिपळूण : कोकणात २००५ नंतर यंदा पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर आलेला महापूर त्यानंतर उद्भवलेली स्थितीवर कोकणातील ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ कसे फोल आहे, ते मदत उशीरा पोहोचल्यामुळे दिसून आले. कोकणातील लोकप्रतिनिधीचा प्रशासनावर किती वचक आहे प्रशासनाकडून कसे काम करून घेतात? कार्यतत्पर किती? हे स्पष्टपणे दिसून आले, आमच्या कोकणातील लोकप्रतिनिधि निष्क्रियता म्हणून अधिकारी सुस्तावले आहे, असे मत कोकणातील क्षत्रीय मराठा खानविलकर फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश खानविलकर यांनी व्यक्त केले आहे.
"कोकणात हवामान खात्याने अंदाज देऊनही लोकप्रतिनिधी जागृत झाले नाहीत. महापूराची सुरुवात झाल्यानंतर कोकणात कुणीही धोक्याचा इशारा देणार सायरन (हॉर्न) वाजला नाही. पोलिसांच्या गाड्या, जि. प. नगरपालिकेच्या गाड्या लोकांना सावध करण्यासाठी फिरल्या नाहीत. नगरपालिकेच्या बोटी कुठे गेल्या? कोणालाच माहीत नाही? आमदार, खासदार, फंडातून घेतलेल्या रुग्णवाहीका कुठे गेल्या? कुणालाच माहित नाही. एकही जेसीबी सापडत नव्हत्या ऐरवी आमचे लोकप्रतिनिधी ५० जेसीबी घेऊन रोडचे व इतर ठेकयाचे काम करतात.
ज्याच्याकडे १५ जेसीबी आहेत ते आमदार म्हणतात जेसीबीत पेट्रोल नाही महापूरात एका ठिकाणी काही कामगार फावड्याने डोंगरात माती काढत होते व त्याच्या बाजूलाच एक जेसीबी उभा होता. त्याचा चालक मस्तपैकी मोबाईलवर कोणाबरोबर बोलत होता. मोबाइल वर विडियो शूटिंग करत होता याला ‘प्रशासन’ म्हणतात का असा," रोखठोक प्रश्न रमेश खानविलकर यांनी विचारला आहे.
"खेडच्या अधिकारी वर्गाच्या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांनी रोखठोक भाषेत नेहमीच्या सवयी प्रमाणे आधिकाऱ्यांच्या कामाचे वाफारे काढले पण महापूर आल्यानंतर तेच वाफारे सातत्याने काढून त्यांना यापूर्वीच कार्यतत्पर ठेवले पाहिजे होते पण तसे झाले नाही दर वेळेला संकटे आली की लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी प्रशासनावर टाकून स्वताची कातडी वाचवतात यासाठीच जनतेने का निवडून द्यायचे याचा ही विचार निश्चितच कोकणवाशिय करणार यात शंका नाही", असे ही रमेश खानविलकर म्हणाले.