आला शुभ‘मंगळ’ काळ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2021   
Total Views |


mars mission edit_1 





जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांकडून मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ कधी असेल, त्याचा अचूक अंदाज घेतला जातो आणि त्यासाठी साधारण जुलैपासून ते १५ ऑगस्टपर्यंतचा काळ योग्य समजला जातो. तेव्हा यानिमित्ताने जगभरातील मंगळमोहिमांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...


पृथ्वी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह एकाच सूर्यमालेतील असल्याने विविध देशांच्या अंतराळ संशोधन संस्थांतर्फे पृथ्वीवरून मंगळावर उपग्रह पाठविले जातात. त्यासाठी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ कधी असेल, त्याचा अचूक अंदाज घेतला जातो. त्यासाठी साधारण जुलैपासून ते १५ ऑगस्टपर्यंतचा काळ योग्य समजला जातो. कारण, पृथ्वी आणि मंगळ ग्रहाच्या बाबतीत अशी संधी २२ महिन्यांनी एकदाच मिळते आणि त्या काळात मंगळ ग्रहाकडे झेप घेण्याचा बेत या संस्थांनी आखला, तर मंगळाची वारी तुलनेने सोयीस्कर ठरते. इथे आपण लक्षात घेतले पाहिजे की, मंगळावर पृथ्वीवरुन जाण्यास तब्बल सात महिने लागतात. पण, तुलनेने अंतर कमी असल्यामुळे पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यास तीन दिवस लागतात.



१९६० पासून विविध अंतराळ संशोधन संस्थांनी मंगळ ग्रहावर वार्‍या करण्याचे प्रयत्न केले. १९७६ ते १९९2 या काळात अंतराळ केंद्रांकडून मंगळमोहिमांचा फारसा अभ्यास झाला नाही. परंतु, एकाच ग्रहाकडे तीन अंतराळ संस्थांनी त्याच वेळेस उपग्रह पाठविण्याचे प्रयत्न, वा मंगळ ग्रहाकडे (वा ग्रहकक्षाकडे) पाठविण्याचे प्रयत्न आतापर्यंत कधी झाले नव्हते, ते आता होताना दिसतात.



सध्याच्या काळात पाच अंतराळ संस्थांनी दहा ठिकाणी मंगळ ग्रहावर यान पाठविण्याचे प्रयत्न केले आहेत. अमेरिका (नासा), युरोपमधील समूह संस्था, भारत (इस्रो), चीन आणि संयुक्त अरब अमिराती अशा पाच अंतराळ संस्थांची मंगळयाने मंगळ भूमीकडे वा कक्षेकडे नेण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. ‘नासा’चे ‘परसव्हिरन्स रोवर’ आणि चीनचे ‘तियानवेन रोवर’ यांनी अनुक्रमे १८ फेब्रुवारीला व मे 22 मध्ये मंगळाच्या भूमीवर पोहोचण्याचे प्रयोग केले आहेत. ‘नासा’ने मंगळावर लँडर इनसाईट, रोवर, तीन कक्षावीर (टेहळणी, ओडिसी व मावेन आर्बिट्रर), भारताकडून मंगळयान, युरोपियन समूहाकडून ‘एक्सप्रेस’ व ‘एक्झोमार्स’, चीनकडून ‘तियानवेन’ आणि युएईकडून ‘होप’ अशी दहा याने मंगळ ग्रहाचे संशोधन करण्यासाठी अंतराळात गेली आहेत.



विदर्भातील लोणार सरोवराची महती



ज्या कुणालाही मंगळावरची नेमकी भूमी आहे तरी कशी, हे बघण्याची उत्सुकता असेल, तर त्यांनी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला एकदा जरुर भेट द्यावी. तिथे गेल्यानंतर त्यांच्या बर्‍याचशा अपेक्षा पूर्ण होऊ शकतील, असे म्हटले तर वावगे ठरु नये. कारण, तेथील वातावरण, नाले व नद्या जवळपास तशाच आहेत. एक उल्कापाषाण पृथ्वीवर ३५ हजार ते ५० हजार वर्षांपूर्वी पडल्यामुळे लोणार सरोवराची निर्मिती झाली. त्यामुळे मंगळाकडे जाणार्‍या ‘रोवर’ची चाचणी या स्थानावरही करता येणे शक्य आहे. मुंबई जवळील अमिटी विद्यापीठाच्या नवीनच स्थापन झालेल्या ‘अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी’ केंद्राचे प्रमुख, ‘एरोस्पेस’ अभियंता सिद्धार्थ पांडे यांनी, एका बैठकीच्या चर्चेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ‘मार्स सोसायटी’चे जोनाथन क्लार्क, जेनीफर ब्लँक इत्यादी सभासद होते, तेव्हा या गोष्टीचे वर्णन केले आहे.



युएई, चीन व ‘नासा’च्या संशोधन यानांची काही अधिक माहिती



संयुक्त अरब अमिरातीच्या ‘होप’ या मंगळ मोहिमेचा दि. १४ जुलै, 22० रोजी जपानच्या ‘मितसुबिशी रॉकेट’द्वारे प्रारंभ झाला. ‘होप’ या उपग्रहाची बांधणी युएई, अमेरिकेचे अ‍ॅरिझोना विद्यापीठ आणि कोलोराडो विद्यापीठ यांनी संयुक्तपणे केली आहे. हा उपग्रह षट्कोनी असून अ‍ॅल्युमिनियमचा आहे. याचे इंधनासह वस्तुमान १,३५० किलो आहे. एकूण आकारमान छोट्या कार एवढे आहे. उपग्रहाचे सोलर पॅनेल १,८०० व्हॅट वीजनिर्मिती करतात, तर रेडिओ संदेशासाठी अ‍ॅण्टेना १.५ मी. आहे. या प्रकल्पासाठी 2० कोटी डॉलर इतका खर्च करण्यात आला. या उपग्रहात महत्त्वाची शास्त्रीय उपकरणे आहेत. तीन अतिनील, लाल, हिरवी व निळी दिसणारी आहेत. त्यात प्रतिमा टिपल्या जातात. या साधनांद्वारे मंगळावरील पाणी, बर्फ, धूळ, ‘एरोझोल’ व ‘ओझोन’ तपासता येईल. उपग्रहाचा प्रवास 2०० दिवसांत ६० दशलक्ष किमी मंगळापर्यंत होईल आणि त्यासाठी ‘नासा’ची संदेश यंत्रणा वापरली जाईल.



मोहिमेची उद्दिष्टे


मंगळाच्या वातावरणाचा व त्यांच्या थरांचा अभ्यास करणे, ‘हायड्रोजन’ व ‘ऑक्सिजन’ वायूंची होणारी घट तपासणे ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. मंगळ ग्रहावर त्याकरिता एक वर्ष वा पृथ्वीची दोन वर्षे तपासणी चालू राहणार आहे.



चीनची मंगळ मोहीम


चीनचा ‘तियानवेन’ उपग्रह दि. २० ते 2५ जुलै दरम्यान ‘लॉन्गमार्च-५या शक्तिशाली चीनच्या दक्षिण किनार्‍यालगतच्या हैनान बेटावरून रॉकेटद्वारे प्रक्षेपित होईल. या बग्गीला सहा चाके आहेत. त्यासोबत ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालणारा हा उपग्रह असेल. बग्गी तेथील पृष्ठभागाचे व १०० मी. खोलपर्यंत पृष्ठभागाखालचे नमुने गोळा करणार आहे. चीनकडून सविस्तर माहिती उपलब्ध नसली तरी उद्दिष्टांमध्ये सद्यःस्थितीचा अभ्यास, भविष्यकाळात मंगळावर मानवी वस्ती स्थापित करण्याची शक्यता तपासणे, तेथील जमीन, वातावरण, पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेणे आदी उद्दिष्टांचा समावेश असेल. या उपग्रहावरील एक कॅमेरा १०० मी.पर्यंत व दुसरा ४०० मी.पर्यंत परिक्रमा करेल. चुंबकीय क्षेत्र, हवामान व वातावरणाची मोजमापे, पृष्ठभागांच्या घटकांची तपासणी करणे, मंगळावरील वहन, चढ-उतार त्या माध्यमातून टिपले जातील.



वरील दोन्ही मोहिमांमागोमाग ‘नासा’चे ‘मार्स २०२०चे प्रक्षेपण ३० जुलैला नियोजित कार्यक्रमानुसार फ्लोरिडातून ‘अ‍ॅटलास रॉकेट’द्वारे होईल. चीनप्रमाणे ‘नासा’च्या बग्गीलाही सहा चाके आहेत. उद्दिष्टात रोवरसाठी उतरण्याच्या वेगवेगळ्या जागा तपासणे, प्राचीन काळातील वस्तीसंबंधी वातावरण, कधी काळी निर्मिलेल्या आणि आता नष्ट झालेल्या जीवसृष्टीची चाहूल तपासण्यासाठी दगडांतील खुणांचे अस्तित्व, दगड-मातीचे नमुने गोळा करणे, भविष्यातील यांत्रिक व मानवी मोहिमांचे प्रात्यक्षिक करणे इत्यादी उद्दिष्टे असतील. मंगळावर ‘नासा’ची निश्चयी बग्गी पोहोचली असून बग्गीबरोबर सात शास्त्रीय उपकरणे सज्ज ठेवली आहेत. ही साधने अभूतपूर्व परीक्षण व नवीन तंत्रज्ञानाने युक्त आहेत. या बग्गीवरील कॅमेर्‍याने द्वीमितीय प्रतिमा वा विस्तारित करण्यासाठी ‘झूम’ करण्याची व्यवस्था आहे. क्ष-किरणांच्या साहाय्याने उच्च क्षमतेच्या बारकाईने जमिनीखालील वेध घेणारे ‘रडार’ही बग्गीगाडीत आहेत.


नासा’चे ‘चतुर’ हेलिकॉप्टर


नासा’च्या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे या बग्गीगाडीच्या पोटाखाली एक छोटे हेलिकॉप्टर पाठविले जात आहे. त्याचे नाव ‘चतुर’ (ingenuity) असे ठेवले आहे. या हेलिकॉप्टरचे वस्तुमान फक्त १. किलो आहे. त्याची उंची १९ इंच, त्याला चार फुटांची पाती असून मिनिटाला 2,४०० फेरे घेणारे आहेत. हे हेलिकॉप्टर मंगळ ग्रहाच्या विरळ वातावरण असलेल्या भागात चालविले जाणार आहे. हे हेलिकॉप्टर सौर पॅनेल व बॅटरीने ऊर्जाधारित आहे. ‘चतुर’मध्ये दोन कॅमेरे (कृष्णधवल व रंगीत) दृश्ये घेण्यासाठी आहेत. मंगळ ग्रहावर ‘नासा’ या अंतराळ संस्थेकडून एक वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग केला जात आहे. ‘चतुर’ नावाचे छोटे हेलिकॉप्टर मंगळाच्या विरळ वातावरणात १९ एप्रिलला यशस्वीपणे उडविले गेले.



दि. ४ डिसेंबर, 2०१2 रोजी ‘नासा’तर्फे औपचारिक घोषणा करण्यात आली व तब्बल साडेसात वर्षांच्या तयारीनंतर दि. ३० जुलै, 22०ला ‘अ‍ॅटलास’ या प्रक्षेपकामार्फत ‘मार्स-22अवकाशात झेपावले. सुमारे सात महिने प्रवास करून १८ फेब्रुवारी, 22१ला रोवर व ‘चतुर’ हेलिकॉप्टर मंगळ भूमीवर अलगद उतरले. दि. ३ एप्रिलला ‘चतुर’ हेलिकॉप्टर निश्चयी बग्गीपासून वेगळे झाले. मंगळावरचे वातावरण पृथ्वीपेक्षा ९९ टक्के विरळ असल्याने हेलिकॉप्टरचे उड्डाण अवघड होऊ नये म्हणून पण वजनाने ते हलके करावे लागले व त्याच्या पात्यांचा वेग प्रचंड करावा लागला. ‘चतुर’ हेलिकॉप्टर व निश्चयी बग्गी मंगळाच्या जिझेरो विवर भागात कार्यरत आहेत. कुठल्याही परग्रहावर हे हेलिकॉप्टरचे उड्डाण पहिले नियंत्रित उड्डाण होते. या हेलिकॉप्टरमध्ये १९०३ मधील राईट बंधूंच्या विमानाचे अवशेष ठेवण्यात आले होते. त्या काळात उत्तर कॅरोलिनात ‘किटी हॉक’ येथे असाच इतिहास घडला होता.
मंगळाच्या पृष्ठभागावर यशस्वी प्रयोगाची छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर ‘नासा’ने हेलिकॉप्टरचा आवाजही प्रसारित केला आहे. पृष्ठभागापासून 2५० फूट उंच उडणार्‍या हेलिकॉप्टरचा आवाज आपल्याला ऐकता येणार आहे. या हेलिकॉप्टरने पाचव्यांदा यशस्वी चाचणी उड्डाण केले.



मंगळ ग्रहावरील ‘नासा’ची निश्चयी बग्गी ग्रहावर पोहोचण्याच्या कामामध्ये भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ स्वाती मोहन यांनी प्रथम रोवरने मंगळ ग्रहावर सुरक्षितपणे उतरण्याच्या कामामध्ये मोठी कामगिरी बजावली आहे.नासा’ने मंगळावर पाठविलेल्या यानाचे नियंत्रण करणार्‍या गटापैकी एक जण लंडनच्या ‘वन बीएचके’मधून ‘नासा’च्या ‘निश्चयी रोवर’चे नियंत्रण करीत आहे. अनेक संकेतस्थळांनी व ब्रिटनमधल्या माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.



मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही, यासंदर्भात संशोधन करण्यात येत आहे. या संशोधक वैमानिकांमध्ये भारतीय वंशाचे संजीव गुप्ता यांचा समावेश आहे. गुप्ता हे काम ‘नासा’च्या मुख्यालयात बसून करत नसून, ते त्यांच्या लंडनच्या घरात बसून या यानाच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. दक्षिण लंडनमधील एक ‘वन बीएचके’ फ्लॅट त्यांनी भाड्याने घेतला आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या प्रवासबंदीमुळे गुप्ता ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. प्रा. गुप्ता यांनी ऑक्सफर्ड पीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजमधून ‘पीएचडी’ केली आहे.



इलन मस्क यांनी मंगळावर व्यावसायिक पर्यटनाच्या योजना आखल्या असल्या, तरी त्या ‘ऑक्सिजन’शिवाय शक्य नाही. आताच्या मोहिमेत ३०० व्हॅट ऊर्जा वापरून वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड वापरून दहा ग्रॅम ऑक्सिजन निर्मितीचा प्रयोग केला जाणार आहे. हे ऑक्सिजन निर्मितीचे प्रमाण वाढवता आले, तर मंगळ मोहिमा नक्कीच यशस्वी होतील. तसेच तेथून पृथ्वीवर परत येण्यासाठी इंधनही मिळेल. मंगळावरील पृष्ठभागाखालचा नकाशा तयार झाला की, या ग्रहावर मानवी वसाहत शक्य आहे का तेही लवकरच समजेल.

 

@@AUTHORINFO_V1@@