मुंबई : भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा नातू आद्य राव वजंदला याने हृदयस्पर्शी गाण्याच्या माध्यमातून आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. भाजप खासदार पूनम महाजन राव यांचा सुपुत्र आद्य राव वजंदला याने शब्दबद्ध केलेल्या गाण्याचा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. आद्यने आपल्या वाढदिवशी आजोबा प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मालसेन्स या युट्युब चॅनलवरून हा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्षांच्या आद्यने मालसन्स (Malsons) या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हे गाणं प्रदर्शित केले आहे. त्याच्या 'शॅडो' (Shadow) या गाण्याला काही वेळातच ४० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं आद्य राव वजंदला यानेच लिहिले असून गायलेही आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये आद्यने आजोबा प्रमोद महाजन, आजी रेखा महाजन यांच्यासोबतच्या फोटोंचा कोलाजही शेअर केला आहे.आद्य हा मालसन्स या युट्युब चॅनेलवरील सर्वात तरुण लेखक आणि गायक असल्याचेही कंपनीने म्हंटले आहे.