मराठा आरक्षण, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कधी पत्र लिहणार?

    27-May-2021
Total Views |

Sharad Pawar_1  
 
 
मुंबई : लक्षद्वीप येथे नवे प्रशासक प्रफुल पटेल यांनी गोमांस बंदीचा प्रस्ताव मांडला. यामुळे सध्या लक्षद्वीपचे वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप प्रकरणात लक्ष घालावे.' या आशयाचे पत्र लिहिले आहे. यावर आता भाजपकडून टीका होत असताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हंटले की, "पहिले पत्र बार मालकांसाठी, दुसरे पत्र हे लक्षद्वीपसाठी पण मराठा आरक्षणाची आणि शेतकऱ्यांच्या नुकसानाची चिंता करणारे पत्र शरद पवार मुख्यमंत्र्यांना कधी लिहणार?" असा सवाल उपस्थित केला आहे.
 
 
 
 
 
 
भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "पहिले पत्र बार मालकांसाठी तर दुसरे पत्र लक्षद्वीपमध्ये गोवंश हत्या बंदी करू नका म्हणून पत्र लिहितात. लॅाकडाऊनमध्ये नुकसान झाले म्हणून बारमालकांना मदत केली पाहिजे असे पत्र लिहिणारे शरद पवार आता लक्षद्वीप बेटावर गोमांसावर बंदी येऊ नये, यासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहितात." असे म्हणत त्यांनी शरद पवारांना ३ महत्वाचे प्रश्न पुढे विचारले आहेत.
 
 
"महाराष्ट्रामध्ये कोकणात वादळ आणि इतर काही भागांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. पण, शेतकऱ्यांची आणि पशुधनाची चिंता व्यक्त करणारे पत्र ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कधी लिहितील? मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र कधी लिहीणार? १२ बलुतेदारांना मदत मिळाली नाही त्याची विचारणा करणारे पत्र राज्यसरकारला पवार साहेब कधी लिहणार?" असे म्हणत केशव उपाध्ये यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.