काँग्रेसच्या नैतिक अध:पतनाचे निदर्शक म्हणजे ‘टूलकीट’ – पूनम महाजन यांचा टोला

    18-May-2021
Total Views |
poonam mahajan_1 &nb


काँग्रेसचा खरा चेहरा वारंवार पुढे येत असल्याची महाजनांची टिका
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : काँग्रेस पक्ष हा नितीमत्ता नसलेला पक्ष आहे. त्यांना देशहितापेक्षाही त्यांचे राजकारण अधिक महत्वाचे वाटते. त्यामुळे या टूलकीटवरून काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे, असा टोला भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी मंगळवारी लगाविला.
 
 
 
 
 
 
 
केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाने बनविलेले टूलकीट उघडकीस आले आहे. त्यावरून काँग्रेसची कोंडी झाली असून भाजप खासदार पूनम महाजन यांनीही काँग्रेसला सुनावले आहे.
खासदार पूनम महाजन म्हणाल्या, काँग्रेस पक्ष हा नितीमत्ता नसलेला पक्ष आहे. आपणास नितीमत्ता नाही, हे काँग्रेस पक्षाचे लहानमोठे कार्यकर्ते वारंवार सिद्ध करीत असतात. काँग्रेसला देशहित अथवा देशाची सुरक्षा यांच्याशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना केवळ भाजप, पंतप्रधान मोदींवर टिका करणे, खोटे आरोप करणे, देशात अपप्रचार करणे आणि त्यावरून स्वतचा राजकीय स्वार्थ साधणे एवढेच जमते. काँग्रेस पक्षाचे उघडकीस आलेले टूलकीट म्हणजे तर काँग्रेस पक्षाच्या नैतिक अध:पतनाचे निदर्शक ठरले आहे, अशी टिका पूनम महाजन यांनी केली.
 
 
 
असे आहे टूलकीट
 
 
• कुंभमेळा हे राजकीय शक्तिप्रदर्शन आहे हे दाखवून द्या आणि त्याचवेळी ईद म्हणजे सौहार्द आणि आनंददायी कौटुंबिक एकत्रीकरण आहे हे विविध फोटोंच्या माध्यमातून ठसवा.
 
 
• पीएम केअर्स फंडाला देणगी देणाऱ्या सेलिब्रिटीजना प्रश्न विचारा, अपमानित करा.
 
 
• गुजराती जनतेला त्यांना होणाऱ्या त्रासामुळे केंद्रसरकार विरुद्ध भडकवा. त्याचवेळी इतर राज्यातील जनतेला गुजराती जनतेला होणारा त्रास न दाखवता गुजरातला जास्त सोयी सुविधा मिळतात हे दाखवून भडकवा.
 
 
• सेंट्रल व्हीस्ता प्रोजेक्ट मोदींच्या वैयक्तिक फायद्याचा आहे असा प्रचार करा.
 
 
• स्थानिक नेत्यांच्या मदतीने 'फ्रेंडली' हॉस्पिटल्स मध्ये बेड्स ब्लॉक करून ठेवा आणि ते फक्त आपल्याच विनंतीवर रुग्णांना मिळतील हे पहा.
 
 
• काँग्रेसच्या ट्विटर हँडलला टॅग करून मदत मागणाऱ्यांनाच मदत करा.
 
 
• पत्रकार, माध्यमकर्मी आणि इतर प्रभावशाली व्यक्तींनी मदत मागितली तर त्यांना प्राधान्य द्या.
 
 
• मोदी समर्थक भासणाऱ्या प्रोफाईल्स द्वारे मोदींवर टीका करा.
 
 
• कोरोनासाठी वारंवार इंडियन स्ट्रेन किंवा मोदी स्ट्रेन हा शब्द वापरा.
 
 
• बुद्धिजीवी वर्गाकडून आणि ओपिनियन मेकर्स कडून मोदींसाठी अपमानजनक शब्द वापरून जास्तीत जास्त मान्यता मिळेल हे पहा.
 
 
• एवढ्या कठीण काळातही मोदींचं अप्रुव्हल रेटिंग (लोकप्रियता) कमी झाली नाही तेव्हा ही संधी वापरून मोदींची इमेज उध्वस्त करा.
 
 
• मृतदेह, अंतीमसंस्कारांचे थरारक नाट्यमय फोटो वापरा, स्थानिक कार्यकर्त्यांद्वारे असे फोटो आंतरराष्ट्रीय मीडियाला मिळतील ह्याची तजवीज करा.