म्हणून शरद पवारांनी घेतली बारमालकांची बाजू!

    10-May-2021
Total Views |

Sharad Pawar _1 &nbs



मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षण, कोरोनाची गंभीर परिस्थिती, ऑक्सिजन तुटवडा या मुद्द्यांवर वक्तव्य करण्याऐवजी हॉटेल आणि बारमालकांसाठी कशी मदत करता येईल, याचे पत्र मुख्यमंत्र्यांसाठी लिहीले. महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि देशातील महत्वाचे नेते केवळ बारमालकांसाठीच का बोलले, असा प्रश्न विचारला जात होता. ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांनी 'महाMTB' आणि 'सा.विवेक'तर्फे आयोजित मुलाखतीत या गोष्टीचे कारण दिले आहे.
 
 
 
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची शंभर कोटी महिना वसुली चौकशी सुरू आहे. यात जर कुणी बारमालकांनी पैसे दिल्याचा आरोप केला तर सरकार पुन्हा अडचणीत येऊ शकते. चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती बाहेर येऊ नये म्हणून पवारांनी बार मालकांची बाजू उचलून धरल्याचा खुलासा थत्ते यांनी केला आहे. त्यामुळे आता कुणीही हॉटेल मालक पैसे घेतले, असा आरोप करू शकणार नाहीत. जर पवारांना बारमालकांची बाजू खरच लावून धरायची असती तर त्यांनी ते पत्र प्रसारमाध्यमांना का दिले असते असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
 
 
ज्यांचे समर्थक पवारांना 'जाणता राजा' संबोधतात त्या पवारांनी सर्व प्रश्न बाजूला सारून केवळ बारमालकांसाठीच आवाज उठवावा हे दुर्दैव आहे, असेही थत्ते म्हणाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी कारमध्ये पवारांची मुलाखत घेतली मात्र, कोरोना किंवा राज्यातील कुठल्याही प्रश्नाबद्दल अवाक्षरही काढले नाही, याबद्दल थत्ते यांनी खेद व्यक्त केला आहे.