भारताच्या कोवॅक्सिनचा अमेरिकेत डंका

    28-Apr-2021
Total Views | 238

covaxin_1  H x



नवी दिल्ली :
भारत बायोटेकनिर्मित स्वदेशी कोवॅक्सीन कोरोनाविरोधी लढ्यात प्रभावी असल्याचे अमेरिकेनेही मान्य केले आहे. कोरोना विषाणूच्या ६१७ व्हेरियंटचा प्रभावीपणे सामना करू शकते असे अमेरिकेने म्हंटले आहे. तसेच भारताला दुसऱ्या लाटेतून वाचण्यात ही लस अधिक प्रभावी ठरेल असेही व्हाईट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. ऍन्थोनी फौसी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना केले आहे.

ऍन्थोनी फौसी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना ते म्हणाले की, "आम्ही भारतात रोज समोर येत असणाऱ्या माहितीचा अभ्यास करत आहोत, त्यामुळे आजपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार आम्ही ठामपणे सांगू शकतो की भारतातील ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे, त्यांच्यात कोरोनाच्या नव्या विषाणूच्या विरोधात लढण्याची क्षमता विकसित झाली आहे."

तसेच फौसी पुढे म्हणतात, भारतात आम्ही जी परिस्थिती सध्या पाहत आहोत त्यानुसार देशात लसीकरणाची गती वाढणे गरजेचे आहे. कोरोनाविरोधातील लढ्यातील एक महत्वपूर्ण भाग आहे. कोवक्सीन ही लस भारतीय कंपनी भारत बायोटेक आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजिने संयुक्तरित्या ही लस विकसित केली आहे. ३ जानेवारीला या लसीच्या आपत्कालीन वापरास आयसीएमआरने मंजुरी दिली. आयसीएमआरच्या क्लिनिकल ट्रायलनुसार ही लस ७८ टक्के प्रभावी आहे.

 भारत बायोटेकनिर्मित स्वदेशी कोवॅक्सीन कोरोना विषाणूच्या ६१७ व्हेरियंटचा प्रभावीपणे सामना करू शकते असे अमेरिकेने म्हंटले आहे.  सर्वाधिक केसेस दिल्ली आणि महाराष्ट्रात आढळून आल्या आहेत. तर कोविडचे आणखी तीन नवीन म्युटंटदेखील देशात आढळून आले. भारतात सध्या आढळून येत असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रभावाचे कारण हेच असल्याचे मानले जात आहे. भारतात सध्या कोविड १९ च्या विरोधात लढा देण्यासाठी सुरु असलेल्या लसीकरण अभियानात २ कोरोना लसीसाठी मान्यता देण्यात आली आहे. ज्यात भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्डचा समावेश आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121