वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे ठाणे महापालिका हतबल

    20-Apr-2021
Total Views |

Thane _1  H x W

तब्बल ५० हजार घरात होम क्वारंटाईन ; कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह घरोघरी सर्वेक्षणाचा बोजवारा



ठाणे 
: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणापुढे ठाणे महापालिका पुरती हतबल झाली असुन तब्बल ५० हजार जण घरातच होम क्वारंटाईन होऊन उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याचे आयसीएमआर आणि सरकारची मार्गदर्शक तत्त्वे आहेत.पहिल्या लाटेत त्यावर प्रचंड भर दिला गेला.मात्र,दुसऱ्या लाटेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह घरोघरी सर्वेक्षणाचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.कामाचा वाढता व्याप आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे हा पेच उदभवला असुन होम क्वारंटाईनं असलेल्या पॉजिटीव्ह रुग्णांची दूरध्वनीवरच चौकशी करून पाटया टाकण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जात असल्याचा आरोप होत आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर आयसीएमआर आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यास सुरुवात केली.त्यामध्ये प्रामुख्याने कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना चाचणीवर भर दिला जात होता. कोरोनाबाधितांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची हायरिस्क आणि संपर्कातील व्यक्तींची लो रिस्क अशी विभागणी केली जात होती.त्यानंतर हायरिस्क व्यक्तींचा शोध घेऊन क्वारंटाईन सेंटरमध्ये १४ दिवस ठेवुन त्यांची कोरोना चाचणीही केली जायची.परंतु,कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन सेंटर्समध्ये पाठवणे बंद केले असून,ज्या संशयितांना घरी विलगीकरणात राहणे शक्य नसेल त्यांनाच क्वारंटाइन सेंटर्समध्ये पाठवण्यात येत आहे.



सध्या दररोज एक ते दिड हजार पॉजिटीव्ह रुग्ण आढळत असल्याने ५० हजार ८६० जण होम क्वारंटाईन आहेत.सध्या रुग्णांची शोध मोहीम राबवविणे पालिकेच्या आवाक्याबाहेर असुन वाढत्या रुग्णसंख्येमुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.कोरोना नियंत्रणासह कर्मचाऱ्यांवर लसीकरणाचीही जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिल्या लाटेत ज्या पद्धतीने काम झाले तसे आता होत नसल्याचे अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सांगितले.पूर्वी कुटुंबातील एखाद्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर अन्य व्यक्तींना लागण होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु आता संपर्ण कटुबालाच कोरोनाचा विळखा पडत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.कोरोनाचा फैलाव ज्या वेगाने होत आहे तो पाहता,कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सध्यातरी शक्य नसल्याची कबुली कर्मचारी देत आहेत.




कोरोनाचे 'ठाणे' 

तलावांचे 'ठाणे' आता कोरोनाचे 'ठाणे' बनु लागले आहे.जिल्हा प्रशासनाकडील आकडेवारीनुसार,सोमवारपर्यत ठाणे मनपाने १४ लाख १४ हजार ८८६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले त्यात १ लाख ६ हजार ३२४ जण पॉजिटीव्ह आढळले.सध्या रुग्णांचा रिकव्हरी रेट ८४ टक्के असला तरी आरोग्य यंत्रणा ढेपाळल्याचे दिसत आहे.कोरोना बाधितांचा शोधच बंद केला असून हातावर शिक्के मारायला कर्मचारीही नाहीत आणि शाईही नाही.कोरोनाच्या पहिल्या लाटेत घरी जाऊन तपासणी व औषधे देण्यासाठी सर्वेक्षण केले जायचे.आता केवळ फोनाफोनी करून विचारपुस करण्याचा फार्स केला जात असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121