
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्या विद्यार्थ्यांची मागणी
मुंबई : मुंबई शहरासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईनच घ्या, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. त्यात मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी ही आंदोलन केले.यावेळी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.विद्यार्थ्यांवर ही दडपशाही का असा सवाल यावर विद्यार्थी व विरोधकांनी विचारला.
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईनच घ्या, विद्यार्थ्यांची मागणी
कोरोना झाल्यावर शिक्षणमंत्री जबाबदारी घेणार का ?येत्या 29 एप्रिलला दहावी, तर 23 एप्रिलपासून बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरू होणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होतील हे बोर्डाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, परीक्षा काळात जर कोरोना झाला आणि विद्यार्थ्यांमुळे त्यांच्या घरी संसर्ग वाढला तर शिक्षणमंत्री जबाबदारी घेणार का? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यी एकत्र आले होते. यावेळी त्यांनी ऑफलाईन परीक्षेचा निषेध नोंदवला व सरकार विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पोलीस परवानगी नसल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. पोलीस व विद्यार्थ्यांमध्ये यावेळी झटापट पाहायला मिळाली.
आम्हाला कोरोनाची खूप भीती
मुंबई शहरासह राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आम्हा विध्यार्थ्यांना कोरोनाची खूप भीती वाटत आहे. आमच्या बरोबर घरच्यांनाही याची भीती वाटत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या आधीच सांगितलंय, की विद्यार्थ्यांना त्याच्या जबाबदारीवर परीक्षा द्यावी लागणार आहे. उद्या जर आम्हाला काही झालं तर याला जबाबदार कोण? म्हणून आमच्या परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन पद्धतीने घ्यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी हे सरकार अपयशी ठरलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थी आपला असंतोष व्यक्त करत असताना, त्यांच्यावर पोलिसांमार्फत दडपशाही करणं हे चुकीचा आहे. लोकशाही विरोधात आहे असं भाजप नेते विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे.