नवाब मलिक खोटारडे

    17-Apr-2021
Total Views |
mansukh_1  H x
 
 
 
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सुनावले
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सर्व उपाय करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनविषयी केलेला दावा हा खोटेपणाने भरलेला असून त्यांनी दिलेली धमकी ऐकून घेतली जाणार नाही, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिला आहे.
 
 
 
राज्यास रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यास कंपन्या नकार देत असून त्यामागे राज्य सरकारचा हात आहे, असा आरोप महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते नवाब मलिक यांनी केला. त्यास केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
ट्विटद्वारे मांडविया म्हणाले, नवाब मलिक यांचे ट्विट्स अतिशय धक्कादायक आहेत. त्यांचा दावा पूर्णपणे खोटा असून त्यांनी दिलेली धमकी ही ऐकून घेतली जाणार नाही. मलिक यांना सत्यपरिस्थितीची अजिबात माहिती नाही. कारण केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत नियमितपणे संपर्कात असून रेमडेसिवीरचा पुरवठा सुरु राहण्यास मदत करीत आहेत. देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन दुप्पट करण्यास प्रारंभ झाला असून अधिकच्या २० उत्पादन प्लांटना परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जनतेस रेमडेसिवीरचा सुरळीत पुरवठा करणे यास आमचे प्राधान्य आहे. केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या सर्व उत्पादकांसोबत संपर्क साधला असून मलिक यांनी दावा केल्याप्रमाणे कोणताही पुरवठा अडकलेला नाही. त्यांनी सदर १६ कंपन्यांची यादी, त्यांच्याकडील रेमडेसिवीरचा साठा याची माहिती द्यावी, असेही मांडविया यांनी म्हटले आहे.
 
 
 
 
दरम्यान, सरकारच्या हस्तक्षेपानंतर, 'रेमडेसिवीर इंजेक्शन' चे प्रमुख उत्पादक / विक्रेत्यांनी इंजेक्शनच्या एमआरपीमध्ये स्वेच्छेने कपात केल्याचे रसायन व खते मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
 

OMM_1  H x W: 0