मुंबई : नुकतेच अभिनेता कार्तिक आर्यनला धर्मा प्रोडक्शनच्या 'दोस्ताना २'मधून बाहेरचा रस्ता दाखवला. यावरून आता पुन्हा एकदा धर्मा आणि करण जोहारवर टीका करण्यात येत आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रानौतने कार्तिक आर्यनला पाठींबा देत पुन्हा एका करण जोहारवर टीका केली आहे. एका ट्विटमध्ये तिने म्हंटले आहे की, "सुशांतसिंह राजपूतसारखं आता कार्तिकच्या मागे लागून त्याला फासावर लटकण्यास असहय्य करू नका." अशी सणसणीत टीका केली आहे. हा वाद तेव्हा वाढला जेव्हा याबाबत धर्मा प्रोडक्शनने कार्तिकवर टीका करत त्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवत असल्याचे सांगितले.
कंगनाने आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, "कार्तिक आर्यन स्वतःच्या मेहनतीवर इथपर्यंत पोहोचला आहे आणि यापुढेही तो स्वतःच्या मेहनतीवरच पुढे जात राहणर. फक्त 'पापा जो' (करण जोहर) आणि त्यांची नेपो गँग यांना विनंती आहे की, कृपया आता त्याला एकटे सोडा. सुशांतसिंह राजपूतसारखे आता कार्तिकच्या मागे लागून त्याला फासावर लटकण्यास असहय्य करू नका. गिधाडांनो कृपया त्याला एकटे सोडा."
"कार्तिक आर्यन या चिल्लर लोकांना घाबरण्याची गरज नाही. वाईट लेख लिहून आणि घोषणा करून हे लोक फक्त तुझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग यासाठी तुलाच जबाबदार ठरवून स्वतः मौन पकडून राहतील. त्यांनी सुशांतसिंह राजपूतचे ड्रग्सचे व्यसन आणि वाईट व्यवहाराची कथा अशीच पसरवली होती.कार्तिक आर्यन आम्ही तुझ्यासोबत आहोत. ज्यांनी तुला तयार केले नाही ते तुला तोडूही शकत नाहीत. आज तुला कदाचित एकटे वाटत असेल पण असे वाटून घेण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येकाला 'ड्रामा क्वीन जो'बद्दल माहीत आहे. स्वतःवर विश्वास ठेव."