पंढरपूर : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राज्यात वातावरण गरमागरम असताना आरोप प्रत्यारोपांच्या फैरी भाजप आणि राष्ट्रवादीत सुरू आहेत. मात्र, ज्या महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र आहेत तिथल्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे. अशाच एका फोटोवरून सध्या टोलेबाजी सुरू आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक फोटो ट्विट करून शिवसैनिकांना चांगलाच टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार एका शिवसेना शाखेत उपस्थित होते. तिथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सैनिकांची काय ही दशा? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाच्या पायावर कुणाचे डोके?, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.