राज्य सरकारच्या निर्णयविलंबाने रेमिडीसवीर पडून

    13-Apr-2021
Total Views |
remdesevir _1  




मुंबई : कोरोनाकाळात निर्णायक भूमिका बजावणारे रेमडेसिवीर औषध मुंबईत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून निर्यातकांकडे ते पडून असल्याची माहीती समोर येत आहे. निर्यात माल असल्याने भारतीय चलनात त्यावर मुद्रित दर छापला जात नाही. राज्य सरकारने रेमिडसवीरचा काळ बाजार रोखण्याच्या नावाखाली दप्तरदिरंगाई चालविली आहे.
 
 
रेमिडसवीरचे दर अन्न व प्रशासन विभाग निश्चित करीत नसल्याने निर्यात करणार्‍या कंपन्यान्यांकडे ते तसेच पडून आहे. राज्य शासन निर्णय घेत नसल्याने हे औषध कोणत्या दरात उपलब्ध करून द्यायचे हा निर्यातदारांसमोरचा प्रश्न आहे. रेमिडसवीर बाजारात थेट व्रिक्रीला आणल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो पर्यायाने साठा असाच पडून असल्याचे समोर येत आहे.
 
 
मुंबईतील अनेक लोकप्रितिनिधी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करत असूनही निर्णय घेतला जात नाही. यामुळे औषध उपलब्ध असूनही मुत्यूच्या दाढेत ओढल्या जाणार्‍या रुग्णांना ते देता येता नाही. मुंबईसह महाराष्ट्रात अशा प्रकारे किमान ५० हजार रेमिडसवीरच्या बाटल्या उपलब्ध आहेत मात्र, सरकार कुठलाही निर्णय घेत नसल्याने हा साठा पडूनच आहे.
 
 
साठा विकत घेऊन माफक दरात विक्री करणार
 
राज्य सरकार दरनिश्चिती करून जीआर काढण्यास तयार नाही. पर्यायाने निर्यातदार कंपन्यासमोर कोणताही पर्याय नाही. गेले चार दिवस मंत्री व प्रशासन या दोघांकडेही मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे मात्र निर्णय घेण्यास कुणालाही वेळ नाही. पर्यायाने मीच हा साठा विकत घेऊन माफक दरात विक्री करण्याचे ठरविले आहे. असे केल्याने होणारी कायदेशीर कारवाई सरकारने माझ्यावर करावी, असे खुले आव्हाहन मी सरकारला करत आहे, असा इशारा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.