‘रेमडेसिवीर’साठी नितीन गडकरी ठरतायत संकटमोचक !

    12-Apr-2021
Total Views |
NG_1  H x W: 0
 

‘मायलन इंडिया’सोबत चर्चा, तात्काळ ४ हजार इंजेक्शनचा पुरवठा
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारचे मंत्री “रेमडेसिवीर आमच्या घरी तयार होत नाही” अशी निर्लज्ज विधाने करण्यात मग्न आहेत. त्याचवेळी राज्यातील ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या तुडवड्याचे संकट दूर करण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी संकटमोचक ठरत आहेत. गडकरी यांनी ‘मायलन इंडिया’कंपनीसोबत चर्चा करून तात्काळ चार हजार इंजेक्शन उपलब्ध करून दिले असून त्यांची दुसरी खेपदेखील लवकरच प्राप्त होणार आहे.
 
 
 
राज्यातील ‘रेमडेसिवीर’चा तुडवडा दूर करण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन करणाऱ्या देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या ‘मायलन/व्हिटारीस इंडीया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्यासाठी दूरध्वनीवरून चर्चा सोमवारी चर्चा केली. त्यानंतर गडकरी यांच्या विनंतीवरून ‘मायलन इंडिया’ने राज्यासाठी तात्काळ चार हजार ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे लवकरच इंजेक्शनची दुसरी खेपदेखील पाठविण्यात येणार आहेत.
 
 
 
यापूर्वीदेखील  गडकरी यांनी ‘सन फार्मा'चे मालक सिंघवी यांच्याशी इंजेक्शनच्या तुडवड्याविषयी चर्चा केली होती. त्यानंतर 'सन फार्मा'मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार मात्रांचा पुरवठा नागपुरात झाला असून उर्वरित मात्रादेखील लवकरच प्राप्त होणार आहेत.