तुम्हीसुद्धा ओरीयो, पार्ले-जीची बिस्कीटं खाता का? मग हे नक्की वाचा!

    09-Mar-2021
Total Views |

orio and parley-g biscuit




मुंबई:
गेले अनेक दिवस ओरीयो आणि पार्ले-जी या बिस्किट कंपन्यांमध्ये सुरु असलेला वाद आता चांगलाच गाजतोय. खरंतर भारतीय बाजारपेठेतली अत्यंत मोठी आणि प्रसिद्ध नावं आहेत. पण आता या दोन्ही बिस्कीट कंपन्यांमध्ये एका बिस्किटाच्या नक्षीवरून हा वाद झाला आहे.
 
 
पार्ले कंपनीच्या बाजारात नवीन आलेल्या 'फॅबिओ' या बिस्किटाच्या डिजाइनवर ओरिओने आक्षेप घेतला आहे. ओरिओ कंपनीच्या म्हणण्यानुसार 'फॅबिओ बिस्कीटवरील नक्षी हुबेहुब ओरिओ बिस्किटसारखी आहे. शिवाय त्याचे पॅकेजिंग सुद्धा अगदी ओरीओशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे आता हा वाद थेट कोर्टात पोचलाय.
 
 
पार्ले ही एक भारतीय कंपनी आहे आणि गेली अनेक वर्षे भारतीय बाजारपेठेत तग धरून आहे. पार्लेने इतरही अनेक बिस्किटं ग्राहकांसाठी बाजारात आणली. तर ओरीयो ही कंपनी भारतीय २०११ मध्ये बाजारपेठेत आली आणि तेव्हापासूनच ग्राहकांच्या पसंतीस उतरली. आणि त्यामुळेच भारतीय बाजारपेठेत इतर बिस्किट कंपन्यांसाठी ओरीयोने तगडी स्पर्धा निर्माण केली.
 
 
ओरीयो बिस्किटाचं लूक एका सँडविच बिस्किटाप्रमाने आहे. त्याचं पॅकेजिंग डिजाइन निळ्या रंगाचे आहे. त्याच्याच सारखे सँडविच बिस्किट आणि निळ्या रंगाच्या कागदात केलेले पॅकेजिंग फॅबिओ बिस्किटचे डिजाइन आहे. त्यामुळे कॉपीराईटच्या अंतर्गत ओरीयोने पार्लेवर गुन्हा दाखल केला आहे. आणि या विरोधात ओरीयो कंपनीने पार्लेवर दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या बद्दलची पहिली सुनावणी १२ एप्रिलला आहे आणि आरोपांची शहानीशा करून कोर्टयावर निर्णय देईल. दोन्ही कंपनीकडून याबाबत अजून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.