कल्याण : मलंगगडावर होळीच्या दिवशी रात्री आरती सुरू असताना बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना आरती करण्यास मज्जाव करुन अरेरावी केली. घोषणाबाजी केली. तसेच जमावबंदी आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस शिपाई उमेळ कोळंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मलंगगडावर विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आरती सुरू असताना त्या ठिकाणी मज्जाव करून नारेबाजी केली. या प्रकरणी मुन्ना शेख, झाकीर शेख, मोहम्मद शेख, गु्ड्ड शेख, तौक्कीर शेख, हुसेन अन्सारी, सरफराज शेख यांच्यासह २० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० जणानी जमाव बंदी आणि कोरोना नियमावलीचा आदेशाचे भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वहिंदू
परिषद आणि बजरंग दलाचे अजय भंजारी, अरुण साळवी, रमेश पाटील, राजेश फुलोरे यांच्यासह २० जणांच्या विरोधात हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जास्त गर्दी करु नये. तसेच जमावबंदी असताना ही मंडळी मलंगगडावरील समाधीच्या ठिकाणी जाऊन आरती करीत होती. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.