टार्गेट बाजूला ठेवून इथेही लक्ष द्या : अतुल भातखळकर

    30-Mar-2021
Total Views |

Nanded_1  H x W
 
मुंबई : राज्यात नांदेडमध्ये शीख समाजाच्या अंदाजे ४०० जणांनी लाठ्या-तलवारींसह 'हल्ला - महल्ला' कार्यक्रमादरम्यान पोलिसांवर हल्ला केला. यासंदर्भात पोलिसांना ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
 
 
 
 
 
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. "गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवावे, तर मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून नांदेडला भेट द्यावी." अशी टीका केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, "नांदेड येथे शीख समाजाच्या कार्यक्रमात पोलिसांवर हल्ला झाल्यामुळे राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. गृहमंत्र्यांनी टार्गेट बाजूला ठेवून इथेही जरा लक्ष द्यावे. जमल्यास, मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडून नांदेडला भेट द्यावी." अशी टीका केली आहे.