मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी मुंबईत तब्बल ५,८८८ रुग्ण सापडले असून रविवारच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सुमारे १००० रुग्ण कमी सापडले. मुंबईत २८ मार्च म्हणजे रविवारी ६९२३ रुग्ण सापडले होते, तर मार्च रोजी ५,८८८ रुग्ण सापडले.
त्यामुळे आजपर्यंतची कोरोनाग्रस्तांची एकुण संख्या४,०४,५६२ पर्यंत पोचली आहे. आज दिवसभरात ३,५६१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३,४४,४९६ झाली. दिवसभरात १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११,६६१ झाली. मुंबईत सध्या ४७,४५३ सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
* मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर : ८५ टक्के
* कोविड रुग्णवाढीचा दर : १.२७ टक्के
* रुग्णवाढीचा कालावधी : ५३ दिवस