कृणाल विश्वविक्रमी खेळीनंतर झाला भावूक
23-Mar-2021
Total Views |
पुणे : भारत आणि इंग्लंडमध्ये आज पुण्यातील एमसीए स्टेडीयमवर पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. यावेळी भारताने ५ विकेट्स गमावत ३१८ धावांचे लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले आहे. यामध्ये धवन आणि राहुलच्या खेळीसोबतच कृणाल पांड्याच्या खेळीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पदार्पणातच फक्त २६ चेंडूंमध्ये दमदार अर्धशतक करत त्याने विश्वविक्रम केला. यावेळी भारताचा डाव संपल्यानंतर तो भावूक झाल्याचे चित्र दिसून आले.
पुण्यातील पहिल्या सामन्यासाठी भारताने संघात काही बदल केले. भारतीय संघात पदार्पण करणार्या कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांना खेळण्याची संधी दिली. २९ वर्षीय कृणालने यापूर्वी त्यान २०१८ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदापर्ण केले होते. त्याने आत्तापर्यंत भारताकडून १८ सामने खेळले आहेत. मात्र, भारताकडून पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळण्याची संधी या दोन्ही खेळाडूंना मिळाली. या पदर्पण करणार्या खेळाडूंना खेळाडूनां निळ्या रंगाची टोपी देण्यात आली यावेळी कृणाल पांड्या भावूक होताना दिसून आला. कृणाल पंड्याला त्याचा लहान भाउ हार्दिक पांड्याच्या हातून ही कॅप देण्यात आली. यावेळी त्याने वडिलांना श्रध्दांजली वाहत आपली ही खेळी त्यांना अर्पित केली.